आयटीआय प्रवेशासाठी दुसऱ्या समुपदेशन फेरीचे आयोजन

धुळे : दिनांक 31 ऑगस्ट, 2023 (जिमाका वृत्त); शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, धुळे येथील प्रवेश सत्र-2023 साठी समुपदेशन फेरीचा दुसरा टप्पा 2 सप्टेंबर 2023 ते 6 सप्टेंबर,2023 या कालावधीत होणार असल्याची माहिती औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य रा.सु.मानकर यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे. औद्योगिक प्रशिक्षण संस्था,धुळे येथे प्रवेश सत्र-2023 च्या प्रवेशासाठी ज्या उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज … Continue reading आयटीआय प्रवेशासाठी दुसऱ्या समुपदेशन फेरीचे आयोजन

कृषि पायाभूत सुविधा निधीबाबत कार्यशाळा संपन्न

धुळे : दिनांक 31 ऑगस्ट, 2023 (जिमाका वृत्त);  जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयामार्फत जिल्ह्यातील शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्याची कृषि पायाभूत सुविधा संदर्भात कार्यशाळा कृषि चिकित्सालय, प्रिंपी ता.धुळे येथे संपन्न झाली. या कार्यशाळेस जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कुर्बान तडवी, प्रकल्प संचालक (आत्मा) नवनाथ कोळपकर, उपविभागीय कृषि अधिकारी बापू गावित,नोडल अधिकारी स्मार्ट प्रकल्प गोरख चौधरी, … Continue reading कृषि पायाभूत सुविधा निधीबाबत कार्यशाळा संपन्न

लम्पी स्कीन संसर्ग केंद्रापासूनचा पाच किमी परिसर बाधित क्षेत्र घोषित-जिल्हाधिकारी अभिनव गोयल

धुळे : दिनांक 29 ऑगस्ट, 2023 (जिमाका वृत्त); धुळे जिल्ह्यातील धुळे तालुक्यातील अजनाळे, बोरविहीर, फागणे, शिंदखेडा तालुक्यातील मालपूर, धावडे, शिरपूर तालुक्यातील सुकवद, अहिल्यापूर, थाळनेर, विखरण खु, व साक्री तालुक्यातील सुकापूर, जैताणे, कुत्तारमारे, कढरे येथील जनावरांमध्ये लम्पी स्कीन डीसीज या साथरोगाचा निष्कर्ष होकारार्थी आला आहे. या रोगाचा प्रसार जिल्ह्यातील अन्य ठिकाणी होवू नये म्हणून प्राण्यांमधील संक्रमण … Continue reading लम्पी स्कीन संसर्ग केंद्रापासूनचा पाच किमी परिसर बाधित क्षेत्र घोषित-जिल्हाधिकारी अभिनव गोयल

पीक स्पर्धेत सहभागी होण्याचे कृषि आयुक्तांचे आवाहन

धुळे : दिनांक 28 ऑगस्ट, 2023 (जिमाका वृत्त); कृषी विभागामार्फत खरीप हंगाम सन २०२३ मध्ये सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, सोयाबीन, भुईमुग व सुर्यफुल या पिकांसाठी आयोजित पीक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ३१ ऑगस्ट २०२३ पर्यंत अर्ज करता येतील. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन राज्याचे कृषी … Continue reading पीक स्पर्धेत सहभागी होण्याचे कृषि आयुक्तांचे आवाहन

*नियोजित धुळे (बोरविहीर) नरडाणा रेल्वेमार्गासाठी संपादीत जमिनधारकांनी* *पोटहिस्सा मोजणी स्वखर्चाने करुन घेण्याचे आवाहन*

*धुळे : दिनांक 28 ऑगस्ट, 2023 (जिमाका वृत्त);* नियोजित धुळे (बोरविहीर) नरडाणा ता. शिंदखेडा नविन रेल्वेमार्गासाठी भूसंपादनाचे कामकाज सुरु असून शिंदखेडा तालुक्यातील एकूण 5 गावांमधील मौजे. वाघाडी ब्रु, वाघाडी खु, कलमाडी, मेलाणे व माळीच येथील खाजगी शेतजमिनीचे क्षेत्र संपादीत करण्यात येत आहे. संपादीत जमिनधारकांनी संपादीत क्षेत्राचा देय असलेला नुकसान भरपाईचा मोबदला मिळण्यासाठी जमिनधारकांनी पोटहिस्सा मोजणी … Continue reading *नियोजित धुळे (बोरविहीर) नरडाणा रेल्वेमार्गासाठी संपादीत जमिनधारकांनी* *पोटहिस्सा मोजणी स्वखर्चाने करुन घेण्याचे आवाहन*

*जवाहर नवोदय विद्यालयात* *सहावीत प्रवेशासाठी 31 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ*

*धुळे : दिनांक 28 ऑगस्ट, 2023 (जिमाका वृत्त);*जवाहर नवोदय विद्यालय, नकाणे, धुळे येथे शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये इयत्ता सहावी वर्गाच्या प्रवेशासाठी 31 ऑगस्ट, 2023 मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती प्राचार्य जवाहर नवोदय विद्यालय,धुळे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे. ऑनलाईन प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना https://navodaya.gov.in ही लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे. इयत्ता पाचवीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या … Continue reading *जवाहर नवोदय विद्यालयात* *सहावीत प्रवेशासाठी 31 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ*

कौशल्य विकास व रोजगार व उद्योजकता विभागामार्फत 31 ऑगस्ट रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन

धुळे : दिनांक 28 ऑगस्ट, 2023 (जिमाका वृत्त); धुळे जिल्ह्यातील युवक-युवतींना विविध खासगी कंपन्या, कारखाने, उद्योग-व्यवसाय आणि आस्थापना यांचेकडील रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्याच्या उद्देशाने प्रत्येक गुरुवारी थेट नियुक्तीसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती कौशल्य विकास रोजगार व उद्योजकताचे सहायक आयुक्त राजू वाकुडे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता … Continue reading कौशल्य विकास व रोजगार व उद्योजकता विभागामार्फत 31 ऑगस्ट रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन

*बारीपाडा येथे वनभाजी महोत्सव उत्साहात संपन्न* *95 महिलांनी घेतला स्पर्धेत सहभाग*

*धुळे : दिनांक 27 ऑगस्ट, 2023 (जिमाका वृत्त);* पर्यटन संचालनालय व जैवविविधता संरक्षण समिती, बारीपाडा यांच्या संयुक्त विद्यमाने वनभाजी स्पर्धा-2023 आज बारीपाडा येथे उत्साहात संपन्न झाली. या स्पर्धेत 95 महिलांनी सहभाग घेतला. या कार्यक्रमाला आमदार मंजुळा गावित, राष्ट्रीय जनजाती आयोग, नवी दिल्लीचे माजी अध्यक्ष हर्षजी चव्हाण, पद्मश्री महेश शर्मा, अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण, अपर पोलीस … Continue reading *बारीपाडा येथे वनभाजी महोत्सव उत्साहात संपन्न* *95 महिलांनी घेतला स्पर्धेत सहभाग*

*पशूपालकांनी वैरण बियाणेसाठी अर्ज सादर करावे*

*धुळे : दिनांक 24 ऑगस्ट, 2023 (जिमाका वृत्त);* शेतकऱ्यांच्या शेतावर वैरण उत्पादनासाठी प्रोत्साहनपर वैरण बियाणे वाटप योजना 2023-2024 साठी पशुपालक शेतकऱ्यांनी अर्ज सादर करावे, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ.आर.एम.शिंदे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे. जिल्ह्यात कमी पर्जन्यमानाच्या पार्श्वभूमीवर पशुधनासाठी पुरेसा चारा उपलब्ध होण्यासाठी पशुपालकांसाठी चारा लागवड बियाणे वाटप योजना राबविण्यात येत आहे. यासाठी … Continue reading *पशूपालकांनी वैरण बियाणेसाठी अर्ज सादर करावे*

‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी’ जिल्हास्तरीय कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नियोजन करावे -जिल्हाधिकारी अभिनव गोयल

धुळे : दिनांक 23 ऑगस्ट, 2023 (जिमाका वृत्त);‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी’ हे अभियान जिल्ह्यात यशस्वी करण्यासाठी सर्व विभागांनी सुक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी दिले. ‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी’ या उपक्रमाची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात जिल्हाधिकारी श्री. गोयल यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम … Continue reading ‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी’ जिल्हास्तरीय कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नियोजन करावे -जिल्हाधिकारी अभिनव गोयल