धुळ्यात आज ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त कार्यशाळा  

धुळे, दि. 30 (जिमाका वृत्तसेवा) : जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त सामाजिक न्याय विभागातर्फे शनिवार दि. 1 ऑक्टोबर 2016 रोजी सकाळी 11 वाजून 30 मिनिटांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण विभाग, धुळे यांनी ही माहिती दिली आहे. दरवर्षी 1 ऑक्टोबर हा दिवस जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन म्हणून साजरा करण्यात … Continue reading धुळ्यात आज ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त कार्यशाळा  

धुळे कार्यालयातर्फे वर्षभरात 143.7 कोटी रुपयांचा विक्रीकर संकलित

विक्रीकर विभागाचे राज्याच्या आर्थिक प्रगतीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान आहे. दरवर्षी 1 ऑक्टोबर हा दिवस विक्रीकर दिन म्हणून साजरा केला जातो. यावर्षी सुध्दा शनिवार 1 ऑक्टोबर 2016 रोजी विक्रीकर दिनानिमित्त धुळे जिल्ह्यातील सर्वांत जास्त कराचा भरणा करणाऱ्या व्यापाऱ्यांचा तसेच उत्कृष्ट काम करणारे अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर धुळे विभागाची माहिती देणारा हा लेख… … Continue reading धुळे कार्यालयातर्फे वर्षभरात 143.7 कोटी रुपयांचा विक्रीकर संकलित

अक्कलपाडा प्रकल्पाच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडले

@ धुळे, दि. 29 (जिमाका वृत्तसेवा) : पांझरा नदीवरील अक्कलपाडा प्रकल्पाच्या डाव्या कालव्यातून आज सकाळी पाणी सोडण्यात आले. पाटबंधारे विभागाच्या अधीक्षक अभियंता अलका अहिरराव यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये ही माहिती दिली आहे. श्रीमती अहिरराव यांनी म्हटले आहे, अवर्षण प्रवण भागात येत असलेल्या निम्न पांझरा (अक्कलपाडा) प्रकल्पातील लाभक्षेत्र धारकांनी डावा कालव्याचे अपूर्ण असलेले काम त्वरेने पूर्ण … Continue reading अक्कलपाडा प्रकल्पाच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडले

धर्मादाय रुग्णालयातील सवलतींची माहिती गरजूंपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करावेत : जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे

धुळे, दि. 29 (जिमाका वृत्तसेवा) : धर्मादाय रुग्णालयात निर्धन व दुर्बल घटकातील रुग्णांसाठी दहा टक्के खाटा राखीव राहतात. अशाप्रकारची जिल्ह्यात नऊ रुग्णालये आहेत. अशा रुग्णालयात मिळणाऱ्या सवलतींची माहिती गरजूंपर्यंत पोहोचविण्यासाठी धर्मादाय आयुक्त कार्यालयाने प्रयत्न करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांनी येथे दिले.             धर्मादाय रुग्णालयांमध्ये मोफत व सवलतीच्या दराने खाटा राखून ठेवण्याच्या योजनेची अंमलबजावणी … Continue reading धर्मादाय रुग्णालयातील सवलतींची माहिती गरजूंपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करावेत : जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे

‘महाराष्ट्र माझा’ छायाचित्र स्पर्धेत धुळ्याचे अशोक पाटील यांना पारितोषिक  

धुळे, दि. 28 (जिमाका वृत्तसेवा) : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने आयोजिण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र माझा’ छायाचित्र स्पर्धेत धुळे येथील छायाचित्रकार अशोक पाटील यांना उत्तेजनार्थ पारितोषिक जाहीर झाले आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी या स्पर्धेचा निकाल मंगळवारी जाहीर केला. या पारितोषिकांचे स्वरूप अनुक्रमे 15 हजार रूपये, 10 हजार रूपये व  … Continue reading ‘महाराष्ट्र माझा’ छायाचित्र स्पर्धेत धुळ्याचे अशोक पाटील यांना पारितोषिक  

महिलांसाठी असलेल्या विविध योजनांची माहिती महिला व बालविकास विभागाने संकलित करावी : जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे

धुळे, दि. 27 (जिमाका वृत्तसेवा) : महिलांच्या सर्वांगीण कल्याणासाठी शासनाच्या वेगवेगळ्या योजना कार्यरत आहेत. त्यांची माहिती संकलित करुन त्यांच्या प्रचार व प्रसिध्दीसाठी या विभागाने प्रयत्न केले पाहिजेत, असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांनी येथे दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात आज सर्व समावेशक जिल्हा सल्लागार समितीची सभा झाली. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा महिला व बालविकास … Continue reading महिलांसाठी असलेल्या विविध योजनांची माहिती महिला व बालविकास विभागाने संकलित करावी : जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे

धुळे जिल्ह्यात 30 सप्टेंबरपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश

धुळे, दि. 27 (जिमाका वृत्तसेवा) : मराठा समाजाच्या मागण्यांसाठी व कोपर्डी घटनेच्या निषेधार्थ मराठा क्रांती मूक मोर्चाचे आयोजन  28/9/2016 रोजी धुळे शहरात करण्यात आले आहे. सदरचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय, धुळे येथे येणार आहे. सदर मोर्चामध्ये लाखोंच्या संख्येने जनसमुदाय सहभागी होणार आहे.  या पार्श्वभूमीवर धुळे जिल्ह्यात दि. 23/9/2016 ते दि. 30/9/2016 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत मुंबई … Continue reading धुळे जिल्ह्यात 30 सप्टेंबरपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश

महामार्ग क्रमांक 6 वरील वाहतूक मार्गातही बदल

        धुळे, दि. 27 (जिमाका वृत्तसेवा) : मराठा समाजाच्या मागण्यांसाठी व कोपर्डी घटनेच्या निषेधार्थ मराठा क्रांती मूक मोर्चा 28/9/2016 रोजी काढण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील वाहतूक मार्गात बदल करणे आवश्यक आहे, असे जिल्हा पोलिस अधीक्षक चैतन्या एस. यांनी जिल्हाधिकारी, जळगाव यांना कळविले आहे.            जिल्हा पोलिस अधीक्षक चैतन्या एस. यांनी … Continue reading महामार्ग क्रमांक 6 वरील वाहतूक मार्गातही बदल

धुळे शहरात येणाऱ्या- जाणाऱ्या बस मार्गात मूक मोर्चाच्या पार्श्वभूमीवर उद्या बदल

धुळे, दि. 27 (जिमाका वृत्तसेवा) : मराठा समाजाच्या मागण्यांसाठी व कोपर्डी घटनेच्या निषेधार्थ मराठा क्रांती मूक मोर्चाचे आयोजन 28/9/2016 रोजी धुळे शहरात करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर 28/9/2016 रोजी सकाळी 6 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत धुळे शहरात येणाऱ्या बसेस ह्या चितोड चौफुली, सुरत बायपासकडून फाशीपूल मार्गे धुळे बसस्थानकावर येतील व त्याच मार्गाने बाहेर जातील. तसेच … Continue reading धुळे शहरात येणाऱ्या- जाणाऱ्या बस मार्गात मूक मोर्चाच्या पार्श्वभूमीवर उद्या बदल

विधान परिषद पदवीधर मतदारसंघासाठी मतदार नोंदणीचा विस्तृत कार्यक्रम जाहीर : जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे

धुळे, दि. 26 : भारत निवडणूक आयोगाने विधान परिषद निवडणुकांसाठी नव्याने मतदार याद्या तयार करण्याचे निर्देश असून आयोगाने मतदार नोंदणीचा विस्तृत कार्यक्रम घोषित केला आहे. त्यानुसार यापूर्वीच्या पदवीधर मतदारसंघाच्या मतदार याद्या न वापरता आता नव्याने मतदार नोंदणी करुन मतदार याद्या तयार करावयाच्या आहेत. विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघासाठी आता 1/11/2016 चे अर्हता दिनांकावर मतदार नोंदणी करता … Continue reading विधान परिषद पदवीधर मतदारसंघासाठी मतदार नोंदणीचा विस्तृत कार्यक्रम जाहीर : जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे