शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील

आयसीयू कक्ष तत्काळ कार्यान्वित करावा : पालकमंत्री अब्दुल सत्तार धुळे, दि. 30 (जिमाका वृत्तसेवा) : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वंकष उपाययोजना करतानाच श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील 55 खाटांचा अतिदक्षता विभाग (आयसीयू) तातडीने कार्यान्वित करावा, असे निर्देश धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे महसूल, ग्रामविकास, बंदरे, खार जमिनी विकास, विशेष साहाय्य राज्यमंत्री … Continue reading शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील

कन्टेन्मेन्ट झोनची परिणामकारक अंमलबजावणी करावी

: जिल्हाधिकारी संजय यादव कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक संपन्न धुळे, दि. 26 (जिमाका वृत्तसेवा) : धुळे जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व्यापक प्रमाणात चाचण्यांना सुरवात केली आहे. त्यामुळे रुग्ण संख्या वाढत आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कन्टेन्मेन्ट झोनची प्रभावीपणे अंमलबजावणी करताना शिरपूरच्या धर्तीवर घरोघरी जावून 45 वर्षांवरील मधुमेह व रक्तदाबाचा विकार असलेल्या … Continue reading कन्टेन्मेन्ट झोनची परिणामकारक अंमलबजावणी करावी

राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त

जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन धुळे, दि. 26 (जिमाका वृत्तसेवा) : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आज सकाळी अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे यांच्या हस्ते राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 00000

धुळे जिल्ह्यात 11 जुलैपर्यंत प्रतिबंधात्मक मनाई आदेश

: जिल्हादंडाधिकारी संजय यादव धुळे, दि. 26 (जिमाका वृत्तसेवा) : आगामी सण, उत्सव व कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये म्हणून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी धुळे जिल्ह्यात 27 जून ते 11 जुलै 2020 या कालावधीत मुंबई पोलिस कायदा कलम 37 (1) (3) चे प्रतिबंधात्मक आदेश जिल्हादंडाधिकारी तथा  जिल्हाधिकारी संजय … Continue reading धुळे जिल्ह्यात 11 जुलैपर्यंत प्रतिबंधात्मक मनाई आदेश

पन्नास नागरिकांच्या उपस्थितीत होणाऱ्या

विवाह सोहळ्यांना मिळणार परवानगी : जिल्हाधिकारी संजय यादव कोरोना विषाणू संदर्भात वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे करावे लागणार पालन           धुळे, दि. 23 (जिमाका वृत्तसेवा) : धुळे जिल्ह्यातील खुले लॉन, विना वातानुकूलित मंगल कार्यालय, हॉल, सभागृह, घर व घराच्या परिसरात 50 नागरिकांच्या मर्यादेत आणि कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग तसेच कोविड 19 संदर्भात वेळोवेळी निर्गमित केलेल्या … Continue reading पन्नास नागरिकांच्या उपस्थितीत होणाऱ्या

धुळे जिल्ह्यात वॉर्डबॉयची 50 पदे रोजंदारी तत्वावर भरणार : जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माणिक सांगळे

धुळे, दि. 22 (जिमाका वृत्तसेवा) : कोविड 19 या साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या उपाययोजनांचा भाग म्हणून कोविड केअर सेंटर व कोविड हेल्थ सेंटर करीता वॉर्डबॉयची 50 पदे रोजंदारी तत्वावर कंत्राटी पध्दतीने भरतीसाठी मंजुरी मिळाली आहे, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माणिक सांगळे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे. वॉर्डबॉय पदासाठी शैक्षणिक अर्हता किमान दहावीची … Continue reading धुळे जिल्ह्यात वॉर्डबॉयची 50 पदे रोजंदारी तत्वावर भरणार : जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माणिक सांगळे

हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तर 11 अभ्यासक्रमांना मान्यता : अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांची माहिती

धुळे, दि. 22 (जिमाका वृत्तसेवा) : नवी दिल्ली येथील भारतीय आयुर्विज्ञान परिषदेने 2020- 2021 या शैक्षणिक वर्षापासून श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात 11 विषयांमध्ये पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांना मान्यता दिली आहे. एकूण 46 जागा असतील. या 11 विषयांपैकी स्त्री रोग व प्रसूतीशास्त्र याविषयात पहिल्या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी एका विद्यार्थ्याने आपला प्रवेश नोंदविला … Continue reading हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तर 11 अभ्यासक्रमांना मान्यता : अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांची माहिती

नियमांचे पालन न करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करावी : जिल्हाधिकारी संजय यादव

  जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना विषाणूबाबत आढावा बैठक धुळे, दि. 22 (जिमाका वृत्तसेवा) : कोरोना विषाणूचा (COVID 19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभाग दिवसरात्र परिश्रम घेत आहेत. मात्र, काही नागरिक, व्यापारी प्रतिष्ठाने लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचना किंवा नियमांचे पालन करताना दिसत नाही. एवढेच नव्हे, तर काही नागरिक मास्क सुध्दा वापरताना दिसत … Continue reading नियमांचे पालन न करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करावी : जिल्हाधिकारी संजय यादव

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन सक्षम : जिल्हाधिकारी संजय यादव रुग्ण संख्या वाढल्यामुळे नागरिकांनी घाबरून जावू नये, सहकार्य करावे

धुळे, दि. 21 (जिमाका वृत्तसेवा) : धुळे जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन विविध पातळ्यांवर प्रयत्न करीत आहे. कोरोनाबाधित रुग्णांवर वेळेवर औषधोपचार होवून मृत्यूचे प्रमाण कमी व्हावे म्हणून जिल्हा प्रशासनाने आरोग्य विभागाच्या माध्यमातून नागरिकांचे आरोग्य तपासणीसाठी व्यापक मोहीम हाती घेतली आहे. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. अशा परिस्थितीत नागरिकांनी घाबरून न जाता … Continue reading कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन सक्षम : जिल्हाधिकारी संजय यादव रुग्ण संख्या वाढल्यामुळे नागरिकांनी घाबरून जावू नये, सहकार्य करावे

अनुज्ञप्तीसाठी वाहन चालकांची चाचणी कुंडाणे रोडवरील नवीन जागेत होणार

धुळे, दि. 19 (जिमाका वृत्तसेवा) : राज्य शासन व परिवहन आयुक्त यांच्या निर्देशानुसार कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व नागरिक, शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी वाहन चालक अनुज्ञप्तीसाठीची चाचणीचे कामकाज प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाच्या नवीन जागेत, कुंडाणे रोड, देवपूर, धुळे येथे स्थलांतरीत करण्यात येत आहे, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी, धुळे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले … Continue reading अनुज्ञप्तीसाठी वाहन चालकांची चाचणी कुंडाणे रोडवरील नवीन जागेत होणार