विनम्र अभिवादन

धुळे : राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादनाचा कार्यक्रम झाला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. अरविंद अंतुर्लीकर, उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे (निवडणूक), जिल्हा पुनर्वसन अधिकारी शुभांगी भारदे, तहसीलदार दत्ता शेजूळ (महसूल), जिल्हा विज्ञान व तंत्रज्ञान अधिकारी महेश खडसे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

वनहक्क दावे निकाली काढण्यासाठी ‘वनमित्र’ मोहीम

          धुळे, दि. 31 (जिमाका वृत्तसेवा) : वनहक्क मान्यता अधिनियम, नियमांची अंमलबजावणी करताना प्रलंबित वनहक्क दावे व अपिलांचा निपटारा येत्या सहा महिन्यात करण्यासाठी वनमित्र मोहीम राबविण्यास शासनाने मान्यता दिली आहे. त्यासाठी राज्यातील सनियंत्रण व समन्वयासाठी आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे येथे वनमित्र कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे, असे उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील (प्रशासन) यांनी प्रसिध्दीस … Continue reading वनहक्क दावे निकाली काढण्यासाठी ‘वनमित्र’ मोहीम

आचारसंहिता लागू असल्याने जिल्हास्तरीय लोकशाही दिन नाही

           धुळे, दि. 31 (जिमाका वृत्तसेवा) : महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी धुळे जिल्ह्यात आचारसंहिता लागू झालेली आहे. त्यामुळे सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय 26 सप्टेंबर 2012 मधील तरतुदीनुसार आचारसंहिता कालावधीत जिल्हास्तरावरील माहे जून 2018 मधील पहिल्या सोमवारी 4 जून 2018 रोजी होणारा जिल्हास्तरीय लोकशाही दिन होणार नाही, असे निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. … Continue reading आचारसंहिता लागू असल्याने जिल्हास्तरीय लोकशाही दिन नाही

तंबाखूमुक्त समाजाच्या निर्मितीसाठी सर्वांचे प्रयत्न आवश्यक : जिल्हाधिकारी राहुल रेखावार

        धुळे, दि. 31 (जिमाका वृत्तसेवा) :  तंबाखूमुक्त समाजासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. धुळे जिल्हा तंबाखूमुक्त होण्यासाठी नियोजन केले असून वेगवेगळे उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. आरोग्य विभागासह शासनाच्या सर्व विभागांनी या उपक्रमात सहभागी होत धुळे जिल्हा तंबाखूमुक्त होण्यासाठी प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी येथे केले. राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जागतिक … Continue reading तंबाखूमुक्त समाजाच्या निर्मितीसाठी सर्वांचे प्रयत्न आवश्यक : जिल्हाधिकारी राहुल रेखावार

टपाल कार्यालयाच्या कामकाजाच्या वेळेत बदल

        धुळे, दि. 30 (जिमाका वृत्तसेवा) :  धुळे शहर अंतर्गत पाच टाउन डिलेव्हरी टपाल कार्यालयाचा वेळ व कामकाजाचे वेळ 28 मे 2018 पासून बदलण्यात आले आहेत. यात प्रामुख्याने मोहाडी लळींग, धुळे जयहिंद कॉलनी, धुळे मार्केट यार्ड, धुळे विद्यानगरी, धुळे एमआयडीसी या टपाल कार्यालयाची कार्यालयीन वेळ ही 08:00 ते 16:00 राहणार आहे, तर कामकाजाची वेळ सोमवार ते … Continue reading टपाल कार्यालयाच्या कामकाजाच्या वेळेत बदल

धुळे जिल्ह्यात 12 जून 2018 पर्यंत प्रतिबंधात्मक मनाई आदेश लागू राहणार : राहुल रेखावार

धुळे, दि. 30 (जिमाका वृत्तसेवा) :  मुस्लीम बांधवांचा पवित्र रमजान महिना (रोजे/ उपवास) सुरू असून 11 जून 2018 रोजी शब्बे ए कद्र (जागरणाची रात्र) आहे. तसेच शहरात अतिक्रमण निर्मुलनाच्या अनुषंगाने शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वरील सण-उत्सवाच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी धुळे जिल्ह्यात 29/05/2018 ते 12/06/2018 … Continue reading धुळे जिल्ह्यात 12 जून 2018 पर्यंत प्रतिबंधात्मक मनाई आदेश लागू राहणार : राहुल रेखावार

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी अभिवादनाचा कार्यक्रम झाला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. अरविंद अंतुर्लीकर, उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे (निवडणूक), राजेंद्र पाटील (प्रशासन), जिल्हा पुनर्वसन अधिकारी शुभांगी भारदे, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी प्रमोद भामरे, तहसीलदार दत्ता शेजूळ यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते...

॥ यशार्थ ॥ अंक ४४॥०३ जून २०१८ ॥

॥ यशार्थ ॥ अंक ४४॥०३ जून २०१८ ॥ ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ◾ प्रोफाईल स्टोरी... पृथ्वीची तप्तपदी! ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ▪ फर्स्ट पोस्ट... वाढते तापमान, बदलते हवामान! ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ▪ फ्रॉम डेस्क ऑफ कलेक्टर... शिक्षक असणार मतदार, निवडून देणार आमदार ! ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ◾ ज ड ण-घ ड ण विकास प्रशासनातील आगळेवेगळे उपजिल्हाधिकारी ‘तुकाराम हुलवळे’ ! ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ◾ ग्रंथार्थ... डेंजरस माईंड्स ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ … Continue reading ॥ यशार्थ ॥ अंक ४४॥०३ जून २०१८ ॥

डेंजरस माईंडस – दहशतवाद्यांच्या सुन्न करणाऱ्या ‘सत्यकथा’

आयसीसकडे कशा हुशार तंत्रज्ञांची टीम आहे आणि सोशल मिडिया हे त्यांचे प्रमुख अस्त्र ते कसे वापरतात  यावर जैदी यांनी अभ्यासपूर्ण संशोधन करून लिहिले आहे. ही संघटना प्रत्यक्ष मनुष्यबळाच्या मदतीने एकीकडे मैदानात लढते तर दुसरीकडे त्यापेक्षाही मोठ्या प्रभावीपणे सोशल मिडीयाच्या माध्यमातून व्हर्च्युअल वॉर खेळण्यात येते हे वाचतांना आपल्या ज्ञानातही भर पडते. जैदी आणि ब्रिजेश सिंह यांनी … Continue reading डेंजरस माईंडस – दहशतवाद्यांच्या सुन्न करणाऱ्या ‘सत्यकथा’

नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ द्विवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर – रघुनाथ गावडे

       भारत निवडणूक आयोगामार्फत महाराष्ट्र विधान परिषद नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ द्विवार्षिक निवडणूक 2018 चा कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. नाशिक विभागातील नाशिक, अहमदनगर, नंदूरबार, धुळे व जळगांव या पाचही जिल्ह्यात आदर्श निवडणूक आचारसंहिता तात्काळ प्रभावाने लागू करण्यात आली असल्याची माहिती उपायुक्त तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी रघुनाथ गावडे यांनी पत्रकार परिषदेत दिली... ‘यशार्थ’चा अंक … Continue reading नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ द्विवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर – रघुनाथ गावडे