धुळे जिल्हा रुग्णालय रुग्ण सेवेसाठी समर्पित : पालकमंत्री दादाजी भुसे

धुळे, दि. 31 (जिमाका वृत्तसेवा) :  जिल्हा रुग्णालय रुग्णांच्या सेवेसाठी समर्पित करण्यात येत आहे. वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रुग्णांना समर्पित भावनेने सेवा द्यावी, असे प्रतिपादन धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे ग्राम विकास राज्यमंत्री दादाजी भुसे यांनी आज येथे केले. जिल्हा रुग्णालयाचा आज लोकार्पण सोहळा आज सायंकाळी आयोजित करण्यात आला होता. तथापि, वाघाडी येथील दुर्घटनेनंतर तो … Continue reading धुळे जिल्हा रुग्णालय रुग्ण सेवेसाठी समर्पित : पालकमंत्री दादाजी भुसे

रासायनिक कंपनीच्या स्फोटाची सखोल चौकशी करणार : पालकमंत्री दादाजी भुसे

वाघाडी येथे घटनास्थळी भेट देवून केली पाहणी  धुळे, दि. 31 (जिमाका वृत्तसेवा) : धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे यांनी आज दुपारी वाघाडी, ता. शिरपूर, जि. धुळे येथे स्फोट झालेल्या रासायनिक कंपनीच्या घटनास्थळाला भेट देवून पाहणी केली. या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे पालकमंत्री श्री. भुसे यांनी … Continue reading रासायनिक कंपनीच्या स्फोटाची सखोल चौकशी करणार : पालकमंत्री दादाजी भुसे

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील वाहतूक मार्ग पूर्ववत

धुळे, दि. 30 (जिमाका वृत्तसेवा) : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील रस्ता व पुलाच्या कामांची दुरुस्ती करण्यात आली असल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्ववत करण्यात आल्याचे आदेश नंदुरबारचे जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले आहेत. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील रस्ता व पूल खचल्याने अवजड वाहनांसाठी नवापूरकडून जाणारी व येणारी वाहतूक नवापूर-उच्छल-कुकरमुंडा ते राज्य मार्ग-4-तळोदा-शहादा-दोंडाईचा-सोनगीर/शिरपूरमार्गे राज्य मार्ग-3 वरून धुळ्याकडे … Continue reading राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील वाहतूक मार्ग पूर्ववत

धुळ्यातील रोजगार मेळाव्यातून 212 उमेदवारांची प्राथमिक निवड

धुळे, दि. 30 (जिमाका वृत्तसेवा) : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, धुळे व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, धुळे यांच्यातर्फे कौशल्य परिवेश मेळावा व रोजगार, ॲप्रेंटिस भरती मेळावा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यातून 212 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली आहे, असे कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहाय्यक … Continue reading धुळ्यातील रोजगार मेळाव्यातून 212 उमेदवारांची प्राथमिक निवड

सैनिकी मुलांच्या वसतिगृहासाठी मानधनावर सहाय्य अधीक्षक पद भरणार

धुळे, दि. 30 (जिमाका वृत्तसेवा) : धुळे येथील जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांच्या अधिपत्याखालील सैनिकी मुलांच्या वसतिगृहासाठी एकत्रित मानधनावर कंत्राटी पध्दतीने 176 दिवसांच्या कालावधीकरीता सहाय्यक वसतिगृह अधीक्षक पदाची भरती करण्यात येणार आहे, असे निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी संजय गायकवाड यांनी प्रसिध्दीस दिलेल्या कळविले आहे. उमेदवार किमान दहावी उत्तीर्ण, मराठी, इंग्रजी व संगणकाचे … Continue reading सैनिकी मुलांच्या वसतिगृहासाठी मानधनावर सहाय्य अधीक्षक पद भरणार

‘हिरकणी-नवउद्योजक महाराष्ट्रा’ची योजनेंतर्गत आज सादरीकरण

धुळे, दि. 30 (जिमाका वृत्तसेवा) : महिलांमधील कल्पना, महिलांना आर्थिक स्वातंत्र्य व राज्याच्या विकासात सहभाग देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘हिरकणी- नवउद्योजक महाराष्ट्राची’ या स्पर्धेंतर्गत धुळे जिल्ह्यातील महिला बचत गटांच्या सदस्यांना, महिलांच्या कल्पनांना व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. या अभियानांतर्गत जिल्हास्तरीय अभियानासाठी निवड झालेल्या महिला बचत गटांसाठी शनिवार 31 ऑगस्ट 2019 रोजी दुपारी 2 वाजता जिल्हा नियोजन सभागृह, … Continue reading ‘हिरकणी-नवउद्योजक महाराष्ट्रा’ची योजनेंतर्गत आज सादरीकरण

जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये16 सप्टेंबरला महिला लोकशाही दिन

धुळे, दि. 30 (जिमाका वृत्तसेवा) : जिल्हाधिकारी कार्यालयात 16 सप्टेंबर 2019 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी 5 सप्टेंबर 2019 पूर्वी अर्ज सादर करावेत, असे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे. या समितीकडे लोकशाही दिनाच्या 15 दिवस पूर्वी अर्ज प्राप्त व्हायलला हवेत. या … Continue reading जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये16 सप्टेंबरला महिला लोकशाही दिन

मागासवर्ग आयोगाकडे हरकती सादर करण्याबाबत आवाहन

 धुळे, दि. 27 (जिमाका वृत्तसेवा) : महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग, पुणे, यांच्याकडे ठेलारी (भटक्या जमातीचा-ब) या जमातीचा समावेश महाराष्ट्र शासनाच्या भटक्या जमातीच्या अ.क्र.29 धनगरची तत्सम म्हणून (भटक्या जमाती-क) मध्ये समावेश करण्याबाबत निवेदन प्राप्त झाले आहे. ठेलारी या जमातीच्या मागणी संदर्भात संस्था, संघटना अथवा व्यक्तींना निवेदन, हरकती व सूचना लेखी स्वरुपात मांडावयाच्या असल्यास त्यांनी  12 सप्टेंबर … Continue reading मागासवर्ग आयोगाकडे हरकती सादर करण्याबाबत आवाहन

अधिकारी व कर्मचाऱ्यांची माहिती दिल्याचे प्रमाणपत्र घेतल्यानंतरच कोषागार विभागाने वेतन अदा करावे : अपर जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे

धुळे येथे जिल्हाधिकारी कार्यालयात नोडल अधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न  धुळे, दि. 27 (जिमाका वृत्तसेवा) : महाराष्ट्र विधानसभेच्या आगामी सार्वत्रिक निवडणूक 2019 करीता मनुष्यबळाची मोठ्या प्रमाणात आवश्यकता भासणार आहे. आतापर्यंत अनेक विभागांनी माहिती सादर केलेली नाही. या पार्श्वभूमीवर धुळे जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालये, राज्य शासनाचे सर्व महामंडळे, केंद्र शासनाचे कार्यालय, स्थानिक स्वराज्य संस्थांचे कार्यालये, अनुदानित माध्यमिक … Continue reading अधिकारी व कर्मचाऱ्यांची माहिती दिल्याचे प्रमाणपत्र घेतल्यानंतरच कोषागार विभागाने वेतन अदा करावे : अपर जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे

नाशिक मर्चन्ट को-ऑपरेटीव्ह बँकेतर्फे मुख्यमंत्री सहायता निधीस 11 लाखांचा धनादेश मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

धुळे, दि. 22 (जिमाका वृत्तसेवा) :  कोल्हापूर, सांगली येथील महापुरात नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी नाशिक मर्चन्ट को-ऑपरेटीव्ह बँकेतर्फे मुख्यमंत्री सहायता निधीस 11 लाखाचा धनादेश दिला. बँकेचे चेअरमन सोहनलाल भंडारी यांनी आज गोंदूर विमानतळावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडे धनादेश सुपूर्त केला. येवल्याचे माजी नगराध्यक्ष प्रफुल्ल पारख यांच्याकडून 1 लाख … Continue reading नाशिक मर्चन्ट को-ऑपरेटीव्ह बँकेतर्फे मुख्यमंत्री सहायता निधीस 11 लाखांचा धनादेश मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त