मुद्रांक व नोंदणी शुल्क परताव्यासाठी ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक

धुळे, दि. 31 (जिमाका वृत्तसेवा) : मुद्रांक परतावा व नोंदणी शुल्क मिळण्यासाठी ऑनलाइन पध्दतीने अर्जाची डाटा एन्ट्री करणे आवश्यक आहे, असे मुद्रांक जिल्हाधिकारी के. एन. भामरे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे. मुद्रांक जिल्हाधिकारी श्री. भामरे यांनी म्हटले आहे, मुद्रांक परतावा व नोंदणी शुल्क परतावा प्रकरणांवर कार्यवाहीसाठी लागणारा कालावधी कमी व्हावा, पारदर्शकता वाढावी म्हणून प्रणाली … Continue reading मुद्रांक व नोंदणी शुल्क परताव्यासाठी ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक

सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे थकित कर्जदारांना आवाहन

धुळे, दि. 31 (जिमाका वृत्तसेवा) : सेंट्रल बँक इंडियाने सर्व थकित कर्जदारांसाठी विशेष योजना सुरू केली असून ही योजना 31 मार्च 2020 पर्यंत सुरू राहील, असे बँकेचे व्यवस्थापक मनोजकुमार दास यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.             श्री. दास यांनी म्हटले आहे, सेंट्रल बँक ऑफ इंडियाने थकित कर्जदारांसाठी विशेष योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत … Continue reading सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे थकित कर्जदारांना आवाहन

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी पहिली व दुसरीसाठी प्रवेश प्रक्रिया

धुळे, दि. 31 (जिमाका वृत्तसेवा) : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, धुळे अंतर्गत येणाऱ्या धुळे, साक्री, शिरपूर, शिंदखेडा तालुक्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना 2020- 2021 या शैक्षणिक वर्षांत शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळेत पहिली व दुसरीच्या वर्गात प्रवेशासाठी 1 जानेवारी 2020 पासून प्रवेश अर्ज वितरित करण्यात येतील, असे प्रकल्प अधिकारी राजाराम हळपे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये … Continue reading अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी पहिली व दुसरीसाठी प्रवेश प्रक्रिया

जि. प. व पं. स. निवडणुकीसाठी प्रत्येक विभागाने दक्षता बाळगावी : उपजिल्हाधिकारी उन्मेश महाजन

धुळे, दि. 31 (जिमाका वृत्तसेवा) : धुळे जिल्हा परिषद व त्याअंतर्गत येणाऱ्या पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 7 जानेवारी 2020 रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येक विभागाने दक्षता बाळगत सूक्ष्म नियोजन करावे, असे निर्देश नोडल अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी उन्मेश महाजन यांनी दिले. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्री. महाजन यांच्या दालनात सनियंत्रण समितीची … Continue reading जि. प. व पं. स. निवडणुकीसाठी प्रत्येक विभागाने दक्षता बाळगावी : उपजिल्हाधिकारी उन्मेश महाजन

‘क्यार’, ‘महा’ चक्रीवादळामुळे बाधित शेतकरी पाल्यांना परीक्षा शुल्क माफ : जिल्हाधिकारी गंगाथरन डी.

धुळे, दि. 31 (जिमाका वृत्तसेवा) : ऑक्टोबर- नोव्हेंबर 2019 मध्ये ‘क्यार’ व ‘महा’ चक्रीवादळामुळे अवेळी आलेल्या पावसामुळे धुळे जिल्ह्यातील धुळे, साक्री, शिंदखेडा, शिरपूर तालुक्यातील शेती पिके व बहुवार्षिक पिकांचे नुकसान झाले. या आपत्तीमुळे नुकसान झालेल्या आपदग्रस्त शेतकऱ्यांना सवलती देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार धुळे जिल्ह्यातील धुळे, साक्री, शिंदखेडा व शिरपूर तालुक्यातील सर्व बाधित गावांना … Continue reading ‘क्यार’, ‘महा’ चक्रीवादळामुळे बाधित शेतकरी पाल्यांना परीक्षा शुल्क माफ : जिल्हाधिकारी गंगाथरन डी.

निवडणूक निरीक्षक 30 रोजी जिल्ह्यात उपलब्ध असणार

धुळे, दि. 27 (जिमाका वृत्तसेवा) : धुळे जिल्हा परिषद व त्याअंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने मुख्य निवडणूक निरीक्षक म्हणून नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा जी. सी. यांची नियुक्ती केली आहे. तसेच अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे यांची निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तरी मुख्य निवडणूक निरीक्षकांसह निवडणूक … Continue reading निवडणूक निरीक्षक 30 रोजी जिल्ह्यात उपलब्ध असणार

सैनिकांप्रती अभिमान बाळगून भरीव निधी उभारण्यास मदत करा : जिल्हाधिकारी गंगाथरन डी.

  सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ         धुळे, दि. 24 (जिमाका वृत्तसेवा) :  देशाच्या सीमांचे प्राणपणाने रक्षण करणाऱ्या सैनिकांचा अभिमान बाळगून त्यांच्या कुटुंबाप्रती प्रशासनासह नागरिकांनी संवेदनशील राहून सैनिकांच्या कल्याणासाठी भरीव निधी उभारण्याचे आवाहन जिल्हाधिकारी  गंगाथरन डी.  यांनी आज केले.             सैनिक बहुउद्देशिय सभागृहात सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ जिल्हाधिकारी तथा सशस्त्र सेना ध्वजदिननिधी संकलन … Continue reading सैनिकांप्रती अभिमान बाळगून भरीव निधी उभारण्यास मदत करा : जिल्हाधिकारी गंगाथरन डी.

गृहरक्षक दलातील जवानांसाठी पोलिस मुख्यालयात दरबार

धुळे, (जिमाका वृत्तसेवा) दि. 21 : धुळे जिल्ह्यातील गृहरक्षक दलाच्या जवानांसाठी पोलिस मुख्यालय, धुळे येथे दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. अपर पोलिस अधीक्षक तथा गृहरक्षक दलाचे समादेशक डॉ. राजू भुजबळ अध्यक्षस्थानी होते. पुरुष व महिला मिळून 217 जवान उपस्थित होते. त्यांनी आपल्या समस्या मांडल्या. त्यांचे निराकरण समादेशक डॉ. भुजबळ यांनी केले. ते म्हणाले, गृहरक्षक दलाच्या … Continue reading गृहरक्षक दलातील जवानांसाठी पोलिस मुख्यालयात दरबार

सर्वोच्च न्यायालयातील याचिकेच्या अधिन राहून होणार निवडणूक

धुळे, (जिमाका वृत्तसेवा) दि. 21 : राज्य निवडणूक आयोगाने धुळे जिल्हा परिषद व त्याअंतर्गत पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम दिला आहे. यासंदर्भात मा. सर्वोच्च न्यायालयातील विशेष अनुमती याचिका क्र.33904-33910/2017 मध्ये नागरिकांच्या मागासप्रवर्गाच्या आरक्षणाचा मुद्दा आव्हानित आहे. राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार होणारी नागरिकांच्या मागासप्रवर्गामधील सदस्यांची निवडणूक ही मा. सर्वोच्च न्यायालयातील विशेष अनुमती याचिका क्र.33904-33910/2017 … Continue reading सर्वोच्च न्यायालयातील याचिकेच्या अधिन राहून होणार निवडणूक

महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरण यांचा दौरा कार्यक्रम

धुळे, (जिमाका वृत्तसेवा) दि. 21 : महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरण, मुंबई येथील अध्यक्ष के. यू. चांदिवाल हे औरंगाबाद  येथे 4 जानेवारी ते 2 फेब्रुवारी 2020 या कालावधीत न्यायाधीकरणातील प्रकरणांमध्ये सुनावणी घेणार आहेत. या कालावधीत ते उत्तम, एन-3 प्लॉट नं. 84 सिडको, उच्च न्यायालयाजवळ, जालना रोड, औरंगाबाद येथे असतील. त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक 9920779333 आणि व्हॉट्सॲप क्रमांक 8888877111 … Continue reading महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरण यांचा दौरा कार्यक्रम