अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील युवकांसाठी सैन्य, पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण वर्ग

धुळे, दि. 29 (जिमाका वृत्तसेवा) : धुळे जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील 18 ते 25 वर्षे वयोगटातील युवकांसाठी सैन्य व पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षणासाठी 40 उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. त्यासाठी संबंधित पात्र स्त्री- पुरुष उमेदवारांनी सोमवार 31 डिसेंबर, 2018 रोजी सकाळी 11 वाजता पोलिस कवायत मैदान, धुळे येथे उपस्थित राहावे, असे आवाहन … Continue reading अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील युवकांसाठी सैन्य, पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण वर्ग

पदवीधर अंशकालीन उमेदवारांना उपस्थितीचे आवाहन

       धुळे, दि. 29 (जिमाका वृत्तसेवा) :  जिल्ह्यातील पदवीधर अंशकालीन उमेदवारांची 30 जानेवारी, 2017 पर्यंतची यादी तयार करून शासनास सादर करण्यात आली आहे. या यादीतील पदवीधर अंशकालीन उमेदवारांची पुन्हा एकदा सर्व समावेशक- सर्वंकष तपासणी/ खात्री करून प्रमाणित यादी शासनास सादर करावयाची असल्याने सदर यादीतील उमेदवारांना आवाहन करण्यात येते की, त्यांचे अंशकालीन उमेदवार असल्याबाबतचे मूळ प्रमाणपत्र, … Continue reading पदवीधर अंशकालीन उमेदवारांना उपस्थितीचे आवाहन

शिधापत्रिकाधारकांनी सदस्यांची तात्काळ आधार नोंदणी करावी : जिल्हा पुरवठा अधिकारी

धुळे, दि. 29 (जिमाका वृत्तसेवा) :  जिल्ह्यातील सर्व अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी शिधापत्रिकाधारकांना आवाहन करण्यात येते की, डिसेंबर 2018 हा महिना RCMS Data Verification व Validation महिना म्हणून साजरा करण्यात येत आहे. त्यानुसार शिधापत्रिका डाटा बेसमधील सर्व सदस्यांची पडताळणी व आधार नोंदणीचे काम सुरू आहे. याद्वारे नवीन लाभार्थ्यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत समाविष्ट करणे, … Continue reading शिधापत्रिकाधारकांनी सदस्यांची तात्काळ आधार नोंदणी करावी : जिल्हा पुरवठा अधिकारी

ईव्हिएम व्हीव्हीपॅटबाबत आजपासून धुळे तालुक्यात प्रशिक्षण व जनजागृती : प्रातांधिकारी गणेश मिसाळ

        धुळे, दि. 29 (जिमाका वृत्तसेवा) :  भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आगामी लोकसभेच्या निवडणूकीसाठी व्हीव्हीपॅट यंत्राचा प्रथमच वापर होणार असल्याने सर्व मतदारांना इव्हिएम व्हीव्हीपॅट बाबत प्रशिक्षण व जनजागृतीसाठी धुळे उपविभागातील धुळे व साक्री तालुक्यातील सर्व गावे,पाडे प्रभागातील विधानसभा मतदार संघनिहाय जनजागृती कार्यक्रम सुरु करण्यात येत आहे. त्यानुसार धुळे ग्रामीण (06) मतदारसंघात 30 डिसेंबर 2018 ते … Continue reading ईव्हिएम व्हीव्हीपॅटबाबत आजपासून धुळे तालुक्यात प्रशिक्षण व जनजागृती : प्रातांधिकारी गणेश मिसाळ

लाभार्थी बोलणार थेट मुख्यमंत्र्यांशी..! बुधवारी ‘लोकसंवाद’ मोबाईल, लॅपटॉप आणि संगणकावर पाहता येणार

धुळे, दि. 28 (जिमाका वृत्तसेवा) : शासनाच्या विविध योजना गरजूंपर्यंत पोहचल्यानंतर त्यातून होणारा लाभ, त्यात येणाऱ्या अडचणी आणि आवश्यक सुधारणा याची माहिती स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘लोक संवाद’ साधून जाणून घेणार आहेत. बुधवार दि. 2 जानेवारी 2019 रोजी सकाळी 11 वाजता लाभार्थी आणि मुख्यमंत्री यांच्यात व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे होणारा थेट लाईव्ह संवाद मोबाईल, संगणक, टॅब आणि लॅपटॉपवरही पाहता येणार … Continue reading लाभार्थी बोलणार थेट मुख्यमंत्र्यांशी..! बुधवारी ‘लोकसंवाद’ मोबाईल, लॅपटॉप आणि संगणकावर पाहता येणार

निवृत्तीवेतन होणार 3 जानेवारी पर्यंत वितरीत : जिल्हा कोषागार अधिकारी पाटील

        धुळे, दि. 28 (जिमाका वृत्तसेवा) :  जिल्हा कोषागार कार्यालयामार्फत निवृत्तीवेतन घेणाऱ्या राज्य शासकीय व इतर राज्यांच्या निवृत्ती वेतन धारकांना कळविण्यात येते की, सद्य स्थितीत निवृत्तीवेतन आज्ञावलीमध्ये हयात दाखल्यांची नोंद घेण्याचे काम सुरु आहे. तथापी अद्यापही काही बँकांकडून हयातीच्या दाखल्यांच्या याद्या अप्राप्त असल्याने माहे डिसेंबर 2018 चे मासिक निवृत्तीवेतन हे  दिनांक 3 जानेवारी 2019 पर्यंत … Continue reading निवृत्तीवेतन होणार 3 जानेवारी पर्यंत वितरीत : जिल्हा कोषागार अधिकारी पाटील

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत नोकर भरती मेळाव्याचे आयोजन

        धुळे, दि. 28 (जिमाका वृत्तसेवा) :  शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, धुळे येथे पुणे येथील नामांकीत कंपनीचा नोकर भरती मेळावा आयोजित करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने आयटीआय इलेक्ट्रिशियन, वायरमन ट्रेड घेवून उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांनी स्वखर्चाने बुधवार दिनांक 2 जानेवारी, 2018 रोजी सकाळी 9.30 वाजता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, धुळे येथे हजर राहण्याचे आवाहन सहाय्यक प्रशिक्षण … Continue reading शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत नोकर भरती मेळाव्याचे आयोजन

महामार्गापासुन अंतरनिर्बन्धात बंद असलेली मद्य विक्री दुकाने सुरू असल्यास तक्रार करण्याचे आवाहन

        धुळे, दि. 28 (जिमाका वृत्तसेवा) :  सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य/ राष्ट्रीय महामार्गापासुन अंतरनिर्बन्धात असलेली आणि जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार बंद करण्यात आलेल्या अनुज्ञप्त्या जरी बंद असल्या तरी वेळोवेळी या अनुज्ञप्तींमध्ये मद्य विक्री सुरु असल्याबाबत तक्रारी प्राप्त होत असतात. त्यानुसार अशा मद्य विक्री दुकानांवर कारवाई करण्यात येत असते.             जिल्ह्यातील राज्य/ राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या एकूण 46 … Continue reading महामार्गापासुन अंतरनिर्बन्धात बंद असलेली मद्य विक्री दुकाने सुरू असल्यास तक्रार करण्याचे आवाहन

प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांशी मुख्यमंत्री साधणार थेट लोकसंवाद

धुळे, दि. 28 (जिमाका वृत्तसेवा) :  केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण व शहरी) तसेच राज्यस्तरीय रमाई आवास योजना (ग्रामीण व शहरी), शबरी आवास योजना व पारधी आवास योजनेंतर्गत गरजू लाभार्थ्यांपर्यंत घरकुलाचा लाभ पोहचल्यानंतर त्यातून होणार लाभ, त्यात येणाऱ्या अडचणी आणि आवश्यक सुधारणा यांची माहिती स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘लोकसंवाद’ साधून घेणार आहेत. यासाठी मुख्यमंत्री … Continue reading प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांशी मुख्यमंत्री साधणार थेट लोकसंवाद

धुळ्यात ग्रंथोत्सव 2018 चे उदघाटन ग्रंथ हे संस्कृती व समाजाचे वैभव आहे : जिल्हाधिकारी राहुल रेखावार

धुळे, दि. 28 (जिमाका वृत्तसेवा) : पुस्तकांच्या वाचनातून ज्ञान आणि आत्मविश्वास वाढतो. पुस्तके आपले सोबती असून त्यामुळे एकटेपणा वाटत नाही. ग्रंथ हे संस्कृती व समाजाचे वैभव आहेत. त्यामुळे प्रत्येकाने ग्रंथोत्सवातून पुस्तकांची खरेदी करीत वाचनाची सवय लावून घ्यावी, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी येथे केले. उच्च व तंत्रशिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, जिल्हा ग्रंथालय … Continue reading धुळ्यात ग्रंथोत्सव 2018 चे उदघाटन ग्रंथ हे संस्कृती व समाजाचे वैभव आहे : जिल्हाधिकारी राहुल रेखावार