धुळे शहरात सीसीटीव्हीसाठी पाच कोटींचा निधी : पालकमंत्री अब्दुल सत्तार अ. नबी

शांतता समितीची बैठक : कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे  धुळे, दि. 31 (जिमाका वृत्तसेवा) : धुळे शहराची शांतता, कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सर्व नागरिकांनी सहकार्य करावे. अफवांवर विश्वास ठेवू नये. दोन दिवसांपूर्वी घडलेल्या घटनेची पोलिस सखोल चौकशी करतील. दोषींवर कारवाई करण्यात येईल. निरपराध व निर्दोष व्यक्तींवर अन्याय होणार नाही. धुळे शहरात … Continue reading धुळे शहरात सीसीटीव्हीसाठी पाच कोटींचा निधी : पालकमंत्री अब्दुल सत्तार अ. नबी

अपघातप्रवण क्षेत्रात ट्रामा केअर सेंटर उभारण्यास शासनाचे प्राधान्य – उध्दव ठाकरे

         धुळे, दि. 30 (जिमाका वृत्तसेवा) : राज्यातील नागरिकांना चांगल्या आरोग्याच्या सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न असून अपघात प्रवण क्षेत्रात ट्रामा केअर सेंटर उभारण्यास शासनाचे प्राधान्य राहील. यामुळे अनेक रुग्णांचे प्राण वाचण्यास मदत होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केले.             धुळे जिल्ह्याची आढावा बैठक आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक … Continue reading अपघातप्रवण क्षेत्रात ट्रामा केअर सेंटर उभारण्यास शासनाचे प्राधान्य – उध्दव ठाकरे

पालकमंत्री अब्दुल सत्तार आज धुळे जिल्हा दौऱ्यावर

धुळे, दि. 30 (जिमाका वृत्तसेवा) : धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे महसूल, ग्रामविकास, बंदरे, खार जमिनी विकास, विशेष साहाय्य विभागाचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार अ. नबी शुक्रवार  31 जानेवारी 2020 रोजी धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. पालकमंत्री श्री. सत्तार यांचा दौरा असा : शुक्रवार 31 जानेवारी 2020 रोजी दुपारी 3.30  वाजता शासकीय विश्रामगृह, धुळे येथे आगमन … Continue reading पालकमंत्री अब्दुल सत्तार आज धुळे जिल्हा दौऱ्यावर

निवृत्तीवेतनधारकांना कोशागार कार्यालयाचे आवाहन

धुळे, दि. 28 (जिमाका वृत्तसेवा) : धुळे जिल्ह्यातील निवृत्तीवेतनधारकांनी निवृत्तीवेतनविषयक कोणत्याही कामांसाठी दिलेल्या खोट्या आश्वासनांवर विश्वास ठेवू नये. तसेच फसवणुकीचे असे प्रकार आढळल्यास संबंधित व्यक्तीविरुध्द पोलिस ठाण्यात किंवा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन जिल्हा कोशागार अधिकारी गजानन पाटील यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये केले आहे. धुळे येथील निवृत्तीवेतन विभागामार्फत निवृत्तीवेतनधारकांना अनुज्ञेय लाभ मंजूर करण्याबाबत … Continue reading निवृत्तीवेतनधारकांना कोशागार कार्यालयाचे आवाहन

धुळे जिल्ह्यात 8 फेब्रुवारीपर्यंत प्रतिबंधात्मक मनाई आदेश : जिल्हादंडाधिकारी गंगाथरन डी.

        धुळे, दि. 28 (जिमाका वृत्तसेवा) :   सी. ए. ए. व एन. आर. सी. कायद्याच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी धुळे जिल्ह्यात 8 फेब्रुवारी 2020 पर्यंत मुंबई पोलिस कायदा कलम 37 (1) (3) चे प्रतिबंधात्मक आदेश जिल्हादंडाधिकारी तथा  जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी लागू केले आहेत.             या आदेशात म्हटले आहे, पोलिस अधीक्षक, धुळे यांनी जिल्ह्यात 25 … Continue reading धुळे जिल्ह्यात 8 फेब्रुवारीपर्यंत प्रतिबंधात्मक मनाई आदेश : जिल्हादंडाधिकारी गंगाथरन डी.

पालकमंत्री अब्दुल सत्तार अ. नबी यांनी घेतला शिव भोजनाचा आस्वाद

धुळे येथे शिव भोजन योजनेचे उदघाटन संपन्न          धुळे, दि. 26 (जिमाका वृत्तसेवा) : राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या शिव भोजन योजनेच्या उदघाटन प्रसंगी धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे महसूल, ग्रामविकास, बंदरे, खार विकास जमिनी, विशेष साहाय्य विभागाचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार अ. नबी यांनी शिव भोजनाचा आस्वाद घेतला.                 धुळे जिल्ह्यात आजपासून … Continue reading पालकमंत्री अब्दुल सत्तार अ. नबी यांनी घेतला शिव भोजनाचा आस्वाद

राज्य शासन शेतकऱ्यांच्या सक्षमकीकरणासाठी कटिबध्द : पालकमंत्री अब्दुल सत्तार अ. नबी

भारतीय प्रजासत्ताक दिनाचा वर्धापन दिवस सोहळा उत्साहात संपन्न  धुळे, दि. 26 (जिमाका वृत्तसेवा) : शेतकरी हाच आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. राज्यातील शेतकऱ्यांना गेल्या काही वर्षांत नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी कटिबध्द असून आगामी काळात धुळे जिल्ह्यात शिक्षण व आरोग्य सेवांचेही बळकटीकरण करण्यात येईल, असे  प्रतिपादन धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा … Continue reading राज्य शासन शेतकऱ्यांच्या सक्षमकीकरणासाठी कटिबध्द : पालकमंत्री अब्दुल सत्तार अ. नबी

धुळे जिल्ह्याचा 2020- 2021 चा प्रारुप आराखडा मंजूर

पालकमंत्री अब्दुल सत्तार अ. नबी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न  धुळे, दि. 25 (जिमाका वृत्तसेवा) : धुळे जिल्ह्याचा सन 2020- 2021 या आर्थिक वर्षाचा प्रारुप आराखडा जिल्हा नियोजन समितीच्या आज झालेल्या बैठकीत मंजूर करण्यात आला. जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) चा आराखडा 147.28 कोटी रुपयांचा असून या नियतव्यास मंजुरी देण्यात आली. तसेच जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजनेचा 122.50 … Continue reading धुळे जिल्ह्याचा 2020- 2021 चा प्रारुप आराखडा मंजूर

लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदानाचा टक्का वाढवावा : अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे

धुळे, दि. 25 (जिमाका वृत्तसेवा) : लोकशाही पद्धतीने भारतात होणारी निवडणूक हा जगासाठी अभ्यासाचा विषय ठरतो. निवडणुकीचे महत्व लक्षात घेवून मतदान आणि मतमोजणी पद्धतीत कमालीची पारदर्शकता राखली जाते. ईव्हीएम संदर्भात प्रामुख्याने सोशल मिडीयावरून होणाऱ्या अपप्रचाराला बळी न पडता लोकशाही बळकट करण्यासाठी अधिकाधिक संख्येने मतदान करून इतर पात्र मतदारांनाही मतदानासाठी प्रवृत्त करावे, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी … Continue reading लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदानाचा टक्का वाढवावा : अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे

अधिकारी आणि कर्मचारी आज घेणार निवडणूक विषयक शपथ : जिल्हा निवडणूक अधिकारी गंगाथरन डी.

धुळे, दि. 23 (जिमाका वृत्तसेवा) : भारत निवडणूक आयोगाचा स्थापना दिवस अर्थात राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त शुक्रवार 24 जानेवारी 2020 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात अधिकारी व कर्मचारी लोकशाहीवर निष्ठा ठेवण्याची शपथ घेणार आहेत. या शपथ कार्यक्रमास सर्व विभागांचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी गंगाथरन डी. … Continue reading अधिकारी आणि कर्मचारी आज घेणार निवडणूक विषयक शपथ : जिल्हा निवडणूक अधिकारी गंगाथरन डी.