मतदानासाठी दिव्यांग मतदारांना सुविधा द्या-राजाराम माने

नाशिक दि.30- विधानसभा निवडणुकीसाठी घेण्यात येणाऱ्या मतदानाच्यावेळी दिव्यांग मतदारांना सुलभतेने मतदान करता यावे यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, तसेच त्यांना मतदानाच्या रांगेत प्राधान्य द्यावे, असे निर्देश विभागीय आयुक्त तसेच प्रवेश योग्यता निरीक्षक (पीडब्ल्युडी ऑब्झर्व्हर) राजाराम माने यांनी दिले. विभागीय आयुक्त्‍ कार्यालयात नाशिक विभागातील उप जिल्हा निवडणूक अधिकारी आणि दिव्यांग मतदार समन्वयकांच्या बैठकीत ते बोलत … Continue reading मतदानासाठी दिव्यांग मतदारांना सुविधा द्या-राजाराम माने

विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी आस्थापनांनी भरपगारी सुटी द्यावी – जिल्हा निवडणूक अधिकारी गंगाथरन डी.

धुळे, दि. 30 (जिमाका वृत्तसेवा) : महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी धुळे जिल्ह्यात 21 ऑक्टोबर 2019 रोजी मतदान होणार आहे. या दिवशी कार्यक्षेत्रातील मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी संबंधित आस्थापनांनी भरपगारी सुटी द्यावी किंवा दोन ते तीन तासांची सवलत द्यावी, असे निर्देश उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाच्या सचिवांनी दिले आहेत. त्यानुसार धुळे जिल्ह्यातील आस्थापनांनी कार्यवाही करावी, … Continue reading विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी आस्थापनांनी भरपगारी सुटी द्यावी – जिल्हा निवडणूक अधिकारी गंगाथरन डी.

विधानसभेच्या मतदानाच्या दिवशी धुळे जिल्ह्यात आठवडे बाजार बंद – जिल्हा निवडणूक अधिकारी गंगाथरन डी.

धुळे, दि. 30 (जिमाका वृत्तसेवा) : महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 21 ऑक्टोबर 2019 रोजी मतदान होणार आहे. या दिवशी जिल्ह्यात भरणारे आठवडे बाजार अन्य सोयीच्या दिवशी भरविण्यात यावेत, असे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी दिले आहेत. याबाबत प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी म्हटले आहे, भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा … Continue reading विधानसभेच्या मतदानाच्या दिवशी धुळे जिल्ह्यात आठवडे बाजार बंद – जिल्हा निवडणूक अधिकारी गंगाथरन डी.

उमेदवारांनी प्रचाराचा खर्च बँकेच्या स्वतंत्र खात्यातून करणे बंधनकारक – जिल्हा निवडणूक अधिकारी गंगाथरन डी.

धुळे, दि. 30 (जिमाका वृत्तसेवा) : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक- 2019 लढविणाऱ्या उमेदवारांनी प्रचारासाठी करावयाचा खर्च निवडणुकीसाठी उघडलेल्या स्वतंत्र बँक खात्यातून करणे बंधनकारक आहे, असे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी कळविले आहे. जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी म्हटले आहे, नामनिर्देशन पत्र सादर करणाऱ्या उमेदवारांनी आपल्या खर्चाचा तपशील निवडणूक निर्णय अधिकारी यांनी पुरविलेल्या खर्च … Continue reading उमेदवारांनी प्रचाराचा खर्च बँकेच्या स्वतंत्र खात्यातून करणे बंधनकारक – जिल्हा निवडणूक अधिकारी गंगाथरन डी.

विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांच्या खर्चाचे सूक्ष्मपणे निरीक्षण करावे : खर्च निरीक्षकांच्या सूचना

धुळे, दि. 28 (जिमाका वृत्तसेवा) : मा. भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू केली आहे. या निवडणुकीत उमेदवारांच्या खर्चाचे सूक्ष्मपणे निरीक्षण करुन उमेदवारांच्या शॅडो रजिस्टरमध्ये या खर्चाच्या नोंदी ठेवाव्यात, अशा सूचना निवडणूक खर्च निरीक्षक ए. आनंदकुमार व श्री. शिवनारायण यांनी आज येथे दिल्या. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 करीता खर्च निरीक्षकांची नियुक्ती करण्यात … Continue reading विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांच्या खर्चाचे सूक्ष्मपणे निरीक्षण करावे : खर्च निरीक्षकांच्या सूचना

मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी विद्यार्थ्यांनी ‘मतदार दूत’ व्हावे : निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड

धुळे, दि. 27 (जिमाका वृत्तसेवा) :  महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 21 ऑक्टोबर 2019 रोजी मतदान होत असून या निवडणुकीत अधिकाधिक मतदारांनी मतदान करावे म्हणून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रमांचाच एक भाग म्हणून विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत सहभागी प्रत्येक स्पर्धकाने ‘मतदार दूत’ होवून मतदारांमध्ये जाणीव जागृती निर्माण करावी, असे आवाहन निवासी … Continue reading मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी विद्यार्थ्यांनी ‘मतदार दूत’ व्हावे : निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड

धुळे जिल्ह्यात 27 ऑक्टोबरपर्यंत शस्त्रास्त्र बाळगण्यास मनाई

  धुळे, दि. 26 (जिमाका वृत्तसेवा) : मा. भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आचारसंहिता घोषित केली असून धुळे जिल्ह्यात आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू आहे. त्यानुसार 21 ऑक्टोबर 2019 रोजी मतदान होईल. निवडणूक मुक्त व निर्भय वातावरणात पार पडावी म्हणून धुळे जिल्ह्यात महसूल स्थळ सीमेच्या हद्दीत कोणत्याही व्यक्तीस (कर्तव्यावरील अधिकारी/कर्मचारी वगळून)  निवडणूक काळात शस्त्र … Continue reading धुळे जिल्ह्यात 27 ऑक्टोबरपर्यंत शस्त्रास्त्र बाळगण्यास मनाई

सहकारी संस्थांची वाहने, जागा वापरण्यास 27 ऑक्टोबरपर्यंत मनाई

धुळे, दि. 26 (जिमाका वृत्तसेवा) : मा. भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान सभेच्या सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा केली असून धुळे जिल्ह्यात 21 ऑक्टोबर 2019 रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी सहकारी संस्थांची वाहने, जागा कोणत्याही पक्षाचा उमेदवार, पक्ष किंवा उमेदवारांच्या प्रतिनिधीस वापरासाठी 27 ऑक्टोबर 2019 पर्यंत धुळे जिल्ह्यात महसूल स्थळ सीमेच्या … Continue reading सहकारी संस्थांची वाहने, जागा वापरण्यास 27 ऑक्टोबरपर्यंत मनाई

विधानसभा निवडणूक प्रचारासाठी धार्मिकस्थळांच्या वापरास प्रतिबंध

धुळे, दि. 26 (जिमाका वृत्तसेवा) : मा. भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू केली आहे. जिल्ह्यात आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू असून या निवडणुकीच्या प्रचारासाठी धार्मिकस्थळांच्या वापरास प्रतिबंध करण्यात आला आहे, असे अपर जिल्हादंडाधिकारी तथा आचारसंहिता कायदा व सुव्यवस्था विभाग, विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 चे नोडल अधिकारी संजय गायकवाड यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले … Continue reading विधानसभा निवडणूक प्रचारासाठी धार्मिकस्थळांच्या वापरास प्रतिबंध

समन्वयक अधिकाऱ्यांनी जबाबदारीने काम पूर्ण करावे : जिल्हा निवडणूक अधिकारी गंगाथरन डी.

  धुळे, दि. 26 (जिमाका वृत्तसेवा) :  महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शुक्रवार 27 सप्टेंबर 2019 पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरवात होईल. प्रत्येक समन्वयक अधिकाऱ्यांनी (नोडल ऑफिसर) दक्षता बाळगत सोपविलेले काम जबाबदारीपूर्वक पूर्ण करावे, असे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी येथे दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात आज सकाळी नोडल अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीचे … Continue reading समन्वयक अधिकाऱ्यांनी जबाबदारीने काम पूर्ण करावे : जिल्हा निवडणूक अधिकारी गंगाथरन डी.