धुळ्यात सैन्यदलाच्या भरतीसाठी प्रक्रिया राबविणार : केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे

धुळेकरांचा ‘आगे बढो’ प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद धुळे, दि. 30 (जिमाका वृत्तसेवा) : भारतीय जवान देशाच्या संरक्षणासाठी नेहमीच तत्पर असतात. त्यांचा भारतीयांना अभिमान आहे. भारतवासीयांबरोबरच धुळेकरांनाही भारतीय सैन्याचा अभिमान आहे. धुळे जिल्ह्यातील जास्तीत जास्त तरुणांना सैन्य दलात भरती होता यावे म्हणून धुळ्यात सैन्य दल भरतीसाठी आर्मी रिक्रूटमेंट व प्रादेशिक सेनेच्या माध्यमातून सैन्य भरती प्रक्रिया राबविण्यात येईल, … Continue reading धुळ्यात सैन्यदलाच्या भरतीसाठी प्रक्रिया राबविणार : केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे

ना.गिरीष महाजन यांच्या माध्यमातून महाराष्ट्रात गोर-गरीबांना मिळते आरोग्यसेवा : केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे

        धुळे, दि. 29 (जिमाका वृत्तसेवा) : राज्याचे वैद्यकीय शिक्षण व जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांच्या माध्यमातून धुळे येथे झालेल्या अटल महाआरोग्य शिबिरातील रुग्णांवर मोतीबिंदूसह इतर आजारांवरील सर्व शस्त्रक्रियांचा पहिला टप्पा आज सुरू झाला असून यामुळे जिल्ह्यातील गोर-गरीबांना मोफत आरोग्य सेवा मिळणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांनी केले.             अटल महाआरोग्य शिबिरातील शस्त्रक्रियेचा … Continue reading ना.गिरीष महाजन यांच्या माध्यमातून महाराष्ट्रात गोर-गरीबांना मिळते आरोग्यसेवा : केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे

सैन्य दलाच्या चित्तथरारक कसरती अनुभवण्याची धुळेकरांना अनोखी संधी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे डॉ.भामरे यांचे आवाहन

धुळे, दि. 29 (जिमाका वृत्तसेवा) : सैन्य दलातर्फे धुळे 30 सप्टेंबर 2018 रोजी आयोजित करण्यात आलेल्या ‘आगे बढो’ या प्रदर्शनाच्या माध्यमातून सैन्य दलाच्या चित्तथरारक कसरती अनुभवण्याची धुळेकरांना अनोखी संधी उपलब्ध होणार असल्याची माहिती केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांनी दिली. धुळे येथे राज्य राखीव पोलिस दलाच्या मैदानावर सैन्य दलाचे ‘आगे बढो’ हे प्रदर्शन आयोजित करण्यात … Continue reading सैन्य दलाच्या चित्तथरारक कसरती अनुभवण्याची धुळेकरांना अनोखी संधी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे डॉ.भामरे यांचे आवाहन

देशाच्या संरक्षणासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या सैनिकांबद्दल अभिमान : डॉ.सुभाष भामरे

धुळे, दि. 29 (जिमाका वृत्तसेवा) :  आपल्या देशाच्या बहुमोल स्वातंत्र्याचे आणि सार्वभौमत्वाचे प्राणपणाने रक्षण करणारा, आपत्तीच्या काळात आपद्ग्रस्त देशबांधवांच्या मदतीलाही धावून जाणारा, देशाचा बहाद्दूर सैनिक ही आपल्या सर्वांसाठी आदराची आणि अभिमानाची बाब असल्याचे प्रतिपादन केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांनी आज केले. शौर्य दिनाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आयोजित कार्यक्रमात डॉ.भामरे बोलत होते. यावेळी … Continue reading देशाच्या संरक्षणासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या सैनिकांबद्दल अभिमान : डॉ.सुभाष भामरे

शेवटच्या रुग्णांपर्यंत आरोग्य सेवा पुरवण्यात यावी : जिल्हाधिकारी राहुल रेखावार

धुळे, दि. 27 (जिमाका वृत्तसेवा) : वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांच्या माध्यामातून झालेल्या भव्य अटल महाआरोग्य शिबीरातील शेवटच्या रुग्णांपर्यंत आरोग्य सेवा पुरविण्यात यावी व त्यासाठी आरोग्य यंत्रणेने सुक्ष्म नियोजन करावे अशा सुचना आढावा बैठकी दरम्यान जिल्हाधिकारी  राहुल रेखावार यांनी दिल्या आहेत. या बैठकीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ.मनिषा गजभिये, ना.गिरीष महाजन यांचे विशेष कार्य … Continue reading शेवटच्या रुग्णांपर्यंत आरोग्य सेवा पुरवण्यात यावी : जिल्हाधिकारी राहुल रेखावार

सैन्य दलाच्या प्रदर्शनासाठी आवश्यक ते सहकार्य करा : जिल्हाधिकारी राहुल रेखावार

धुळे, दि. 27 (जिमाका वृत्तसेवा) : सैन्य दलातर्फे धुळे येथे 29  व 30 सप्टेंबर 2018 रोजी आयोजित ‘आगे बढो’ या प्रदर्शनाला जिल्हा प्रशासनाने सर्वतोपरी सहकार्य करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिल्या आहेत. धुळे येथे राज्य राखीव पोलिस दलाच्या मैदानावर सैन्य दलाचे ‘आगे बढो’ हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाची सध्या जय्यत … Continue reading सैन्य दलाच्या प्रदर्शनासाठी आवश्यक ते सहकार्य करा : जिल्हाधिकारी राहुल रेखावार

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी सहकार्य करावे : विभागीय आयुक्त राजाराम माने

            धुळे, दि. 27 (जिमाका वृत्तसेवा) : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार धुळे जिल्ह्यात 1 जानेवारी 2019 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे.  मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी सहकार्य करावे, असे आवाहन नाशिक विभागाचे विभागीय महसूल आयुक्त तथा मतदार यादी निरीक्षक राजाराम माने यांनी येथे केले.             … Continue reading मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी सहकार्य करावे : विभागीय आयुक्त राजाराम माने

माझ्या यशात ‘लोकराज्य’चा मोलाचा वाटा : उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रांत बांदल

लोकराज्य वाचक अभियानांतर्गत शिरपूरला वाचक मेळावा धुळे, दि. 27 (जिमाका वृत्तसेवा) : केंद्रीय लोकसेवा आयोग, महाराष्ट्र लोकसेवा आयोगासह विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होण्यासाठी लोकराज्य मधील संदर्भ अत्यंत उपयुक्त ठरतात. माझ्या यशातही लोकराज्य चा मोलाचा वाटा आहे, असे प्रतिपादन उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रांत बांदल यांनी केले. जिल्हा माहिती कार्यालय, धुळे आणि किसान विद्या प्रसारक संस्थेच्या एसपीडीएम … Continue reading माझ्या यशात ‘लोकराज्य’चा मोलाचा वाटा : उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रांत बांदल

सुदृढ लोकशाहीसाठी उत्कृष्ट निवडणूक प्रक्रिया ठरणार पोषक : विभागीय आयुक्त राजाराम माने

            धुळे, दि. 27 (जिमाका वृत्तसेवा) : लोकशाही ही जगातील सर्वश्रेष्ठ राज्य पध्दती असून जागरूक मतदार हाच खरा मतदार राजा आहे. सुदृढ लोकशाहीसाठी उत्कृष्ट निवडणूक प्रक्रिया पोषक ठरेल असे प्रतिपादन नाशिक विभागीय आयुक्त राजाराम माने यांनी आज केले.             बापूसाहेब शिवाजीराव देवरे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित उत्कृष्ट निवडणूक प्रक्रिया कार्यशाळेत मार्गदर्शन करतांना आयुक्त श्री.माने बोलत … Continue reading सुदृढ लोकशाहीसाठी उत्कृष्ट निवडणूक प्रक्रिया ठरणार पोषक : विभागीय आयुक्त राजाराम माने

अन्न व औषध प्रशासनातर्फे नियंत्रण कक्षाची स्थापना

            धुळे, दि. 26 (जिमाका वृत्तसेवा) : ऑनलाइन फार्मसीच्या विरोधात केमिस्ट ॲण्ड ड्रगिस्ट असोसिएशनने 28 सप्टेंबर 2018 रोजी देशव्यापी बंद पुकारला आहे. या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने सर्व औषध विक्रेत्यांना दुकाने नियमितपणे सुरू ठेवण्याचे आवाहन केले आहे. तसेच बंदच्या काळात रुग्णांची गैरसोय होवू नये म्हणून अन्न व औषध प्रशासनाने खास नियंत्रण कक्षाची स्थापना केली … Continue reading अन्न व औषध प्रशासनातर्फे नियंत्रण कक्षाची स्थापना