संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांनी हयातीचे दाखले सादर करावेत

  धुळे, दि. 30 (जिमाका वृत्तसेवा) : राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्या माध्यमातून विविध सामाजिक अर्थसहाय्य योजना राबविल्या जातात. या योजनांचा लाभ हा तहसीलदार, संजय गांधी निराधार योजना कार्यालय, नगरपालिका क्षेत्र यांच्यामार्फत वितरीत केला जातो. 20 ऑगस्ट 2019 च्या शासन निर्णयानुसार जे लाभार्थी या अर्थसाहाय्य योजनांचा लाभ घेत आहेत, अशा सर्व … Continue reading संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांनी हयातीचे दाखले सादर करावेत

प्रधानमंत्री मातृवंदना सप्ताहाचे धुळे जिल्ह्यात उद्यापासून आयोजन

धुळे, दि. 30 (जिमाका वृत्तसेवा) : धुळे जिल्ह्यात 2 ते 8 डिसेंबर 2019 या कालावधीत प्रधानमंत्री मातृवंदना योजनेंतर्गत मातृ वंदना सप्ताह राबविण्यात येणार आहे. यानिमित्त विविध कार्यक्रम होणार आहेत. प्रधानमंत्री मातृवंदना योजनेस दोन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त शहरी व ग्रामीण भागात लागू करण्यात आली आहे. निरोगी राष्ट्र घडविण्यासाठी ‘सुरक्षित जननी- विकसित धारिणी’ राबविण्यात येणार आहे. या … Continue reading प्रधानमंत्री मातृवंदना सप्ताहाचे धुळे जिल्ह्यात उद्यापासून आयोजन

पीएम किसान पोर्टलवरील माहिती शेतकऱ्यांनी तत्काळ अद्ययावत करावी : जिल्हाधिकारी गंगाथरन डी.

धुळे, दि. 30 (जिमाका वृत्तसेवा) : प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेसाठी धुळे जिल्ह्यातील सर्व शेतकरी कुटुंबांची माहिती पीएम किसान (PM KISAN) पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. त्यापैकी पात्र शेतकरी लाभार्थ्यांना या योजनेचा तीन टप्प्यातील लाभ काही लाभार्थ्यांना प्राप्त झाला आहे. यापुढील लाभासाठी लाभार्थी शेतकऱ्यांच्या आधार कार्डवरील नावानुसारच लाभ अदा करण्यात येतील. त्यासाठी शेतकऱ्यांनी पीएम किसान पोर्टलवर … Continue reading पीएम किसान पोर्टलवरील माहिती शेतकऱ्यांनी तत्काळ अद्ययावत करावी : जिल्हाधिकारी गंगाथरन डी.

विभागीय भ्रष्टाचार निर्मुलन समितीच्या बैठकीचे आयोजन

धुळे, दि. 29 (जिमाका वृत्तसेवा) : नाशिक विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीची बैठक 9 डिसेंबर 2019 रोजी दुपारी 12 वाजता विभागीय आयुक्त राजाराम माने यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालय नाशिकरोड, नाशिक या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे. सदर बैठकीसाठी ज्या नागरिकांना तक्रार अर्ज सादर करायचे असतील त्यांनी समक्ष बैठकीचे दिवशी किंवा पोस्टाने सादर करण्याचे आवाहन भ्रष्टाचार … Continue reading विभागीय भ्रष्टाचार निर्मुलन समितीच्या बैठकीचे आयोजन

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवावा : जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे

धुळे, दि. 29 (जिमाका वृत्तसेवा) : धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगाम 2019 मध्ये सहभाग नोंदवीत लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे यांनी केले आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. सोनवणे यांनी म्हटले आहे, प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगाम  कर्जदार शेतकऱ्यांना बंधनकारक असून बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक … Continue reading प्रधानमंत्री पीक विमा योजनेत शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवावा : जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे

‘मुलगी वाचवा- देश वाचवा’ विषयावर पथनाट्याचे प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

धुळे, दि. 29 (जिमाका वृत्तसेवा) : धुळे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने पीसीपीएनडीटी कायद्यांतर्गत ‘मुलगी वाचवा- देश वाचवा’ या विषयावर पथनाट्य सादर करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांकडून प्रस्ताव मागविले आहेत. स्वयंसेवी संस्था, वैयक्तिक गट, व्यावसायिक संस्था यामध्ये ज्या पथनाट्य कलावंतांना पथनाट्य सादर करावयाचे असतील त्यांनी आपल्याकडील कलावंतांची संख्या, पथनाट्याचा कालावधी इतर आवश्यक बाबींचा (पथनाट्याचे मानधन) समावेश असलेला परिपूर्ण प्रस्ताव … Continue reading ‘मुलगी वाचवा- देश वाचवा’ विषयावर पथनाट्याचे प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

जागतिक एड्स दिनानिमित्त धुळ्यात सोमवारी रॅली

धुळे, दि. 29 (जिमाका वृत्तसेवा) : जागतिक एड्स दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी, मुंबई व जिल्हा रुग्णालय, धुळे यांच्यातर्फे सोमवार 2 डिसेंबर 2019 रोजी सकाळी 8 वाजता जिल्हा रुग्णालय, धुळे येथून रॅली काढण्यात येणार आहे, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एम. पी. सांगळे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे. 00000

निवृत्तीवेतनधारकांचा सात डिसेंबरला मेळावा

धुळे, दि. 29 (जिमाका वृत्तसेवा) : जिल्हा कोशागार अधिकारी कार्यालय, धुळे यांच्यातर्फे 7 डिसेंबर 2019 रोजी सकाळी 11 वाजता ज्येष्ठ नागरिक सभागृह, शिवतीर्थजवळ, संतोषी माता मंदिर चौक, धुळे येथे राज्य शासकीय व इतर राज्यांच्या निवृत्तीवेतनधारकांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. निवृत्ती वेतनधारकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा कोशागार अधिकारी गजानन पाटील यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये … Continue reading निवृत्तीवेतनधारकांचा सात डिसेंबरला मेळावा

आचारसंहिता लागू असल्याने लोकशाही दिन नाही

धुळे, दि. 29 (जिमाका वृत्तसेवा) : धुळे जिल्हा परिषद व त्याअंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी जिल्ह्यात आचारसंहिता लागू असल्याने दरमहा पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालय, धुळे येथे होणारा जिल्हास्तरीय लोकशाही दिन होणार नाही, असे जिल्हा प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे. आचारसंहिता कालावधी संपुष्टात आल्यानंतर येणाऱ्या महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येईल. याची जिल्ह्यातील नागरिकांनी … Continue reading आचारसंहिता लागू असल्याने लोकशाही दिन नाही

धुळे जिल्ह्यात सातव्या आर्थिक गणनेस सुरवात : जिल्हाधिकारी गंगाथरन डी.

सर्वेक्षणासाठी येणाऱ्या प्रगणकांना नागरिकांनी सहकार्य करावे धुळे, दि. 27 (जिमाका वृत्तसेवा) :  धुळे जिल्ह्यात केंद्र सरकारच्या सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयामार्फत सातव्या आर्थिक गणनेस सुरवात झाली आहे. ही संपूर्णत: शासकीय गणना असल्याने नागरिकांनी आपल्या कुटुंबाची, सर्व आर्थिक उपक्रमांची, व्यवसायाची खरी माहिती सर्वेक्षणासाठी येणाऱ्या प्रगणकांना देत राष्ट्रीय उपक्रमास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हास्तरीय समन्वय … Continue reading धुळे जिल्ह्यात सातव्या आर्थिक गणनेस सुरवात : जिल्हाधिकारी गंगाथरन डी.