धुळे आणि शिंदखेडा तालुक्यातील 200 गावांचा वॉटर कप स्पर्धेत सहभाग श्रमदानात सहभागी होण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

धुळे, दि. 30 (जिमाका वृत्तसेवा) : धुळे व शिंदखेडा तालुक्यातील 200 गावांनी पानी फाऊंडेशनतर्फे आयोजित सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा 2019 मध्ये सहभाग नोंदविला असून प्रत्यक्ष श्रमदानास 8 एप्रिल 2019 पासून सुरवात होणार आहे. या श्रमदानात नागरिकांसह अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे. गेल्या काही वर्षांत पावसाचे प्रमाण … Continue reading धुळे आणि शिंदखेडा तालुक्यातील 200 गावांचा वॉटर कप स्पर्धेत सहभाग श्रमदानात सहभागी होण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

होर्डिंग्जसह प्रचाराचे साहित्य लावण्यापूर्वी संबंधित मालकाची परवानगी आवश्यक : अपर जिल्हादंडाधिकारी संजय गायकवाड

धुळे, दि. 30 (जिमाका वृत्तसेवा) : महाराष्ट्र मालमत्तेच्या विरुपणास प्रतिबंध अधिनियमानुसार भिंती लेखन आणि पोस्टर्स लावणे, खासगी परिसरातील मालमत्तेवर होर्डिंग्ज, बॅनर, झेंडे इत्यादी ठेवणे किंवा लावण्यास संबंधित खासगी मालमत्ताधारकांकडून पूर्व लिखित परवानगी घेणे आवश्यक आहे, असे कायदा व सुव्यवस्था विभागाचे नोडल अधिकारी तथा अपर जिल्हादंडाधिकारी संजय गायकवाड यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे. अपर जिल्हादंडाधिकारी … Continue reading होर्डिंग्जसह प्रचाराचे साहित्य लावण्यापूर्वी संबंधित मालकाची परवानगी आवश्यक : अपर जिल्हादंडाधिकारी संजय गायकवाड

निवडणुकीच्या प्रचारासाठी धार्मिक स्थळांच्या वापरास प्रतिबंध : अपर जिल्हादंडाधिकारी संजय गायकवाड

धुळे, दि. 29 (जिमाका वृत्तसेवा) : भारत निवडणूक आयोगाने 10 मार्च 2019 पासून लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू केली असून 2- धुळे लोकसभा मतदारसंघात आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू आहे. आदर्श आचारसंहितेच्या तरतुदीनुसार कोणत्याही प्रकारच्या  प्रचारासाठी पुजेच्या, उपासनेच्या स्थळांचा, ठिकाणांचा वापर करण्यास प्रतिबंधित करण्यात आले आहे, असे कायदा व सुव्यवस्था विभागाचे नोडल अधिकारी तथा अपर जिल्हादंडाधिकारी … Continue reading निवडणुकीच्या प्रचारासाठी धार्मिक स्थळांच्या वापरास प्रतिबंध : अपर जिल्हादंडाधिकारी संजय गायकवाड

जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केली जिल्हा कोषागाराची वार्षिक तपासणी

धुळे, दि. 29 (जिमाका वृत्तसेवा) : आर्थिक वर्षाअखेरीच्या अनुषंगाने महाराष्ट्र कोषागार नियम 1968 नुसार जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी जिल्हा कोषागार कार्यालयास भेट देवून वार्षिक तपासणी केली. यावेळी जिल्हा कोषागार अधिकारी गजानन पाटील यांच्यासह अपर कोषागार अधिकारी चैतन्य परदेशी, रतिलाल निकम, गजानन देवचक्के, एस.के.चौधरी आ‍दि उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी श्री.रेखावार यांनी कोषागारातील सुरक्षा कक्षास भेट देवून … Continue reading जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केली जिल्हा कोषागाराची वार्षिक तपासणी

धुळे जिल्ह्यातून आतापर्यंत 330 शस्त्रास्त्रे जमा : जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी राहुल रेखावार

धुळे, दि. 29 (जिमाका वृत्तसेवा) : लोकसभा निवडणूक 2019 मध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी निवडणूक कालावधीत धुळे जिल्ह्यातील शस्त्रास्त्र धारकांना शस्त्र जमा करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार 28 मार्च 2019 अखेर धुळे जिल्ह्यातून 330 शस्त्रे जमा करण्यात आली आहेत, असे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले … Continue reading धुळे जिल्ह्यातून आतापर्यंत 330 शस्त्रास्त्रे जमा : जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी राहुल रेखावार

आंतरराज्य तपासणी नाक्यांवर दक्षता बाळगावी : जिल्हाधिकारी राहुल रेखावार

धुळे, दि. 29 (जिमाका वृत्तसेवा) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 करीता आदर्श आचारसंहितेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी आंतरराज्य तपासणी नाक्यांवर नियुक्त स्थायी निगराणी पथकांना दक्षता बाळगण्याच्या सूचना द्याव्यात, असे निर्देश जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात आज दुपारी आंतरराज्य सीमेलगतच्या जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी … Continue reading आंतरराज्य तपासणी नाक्यांवर दक्षता बाळगावी : जिल्हाधिकारी राहुल रेखावार

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशांप्रमाणे मतदान केंद्रांवर सुविधा पुरवाव्यात : जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी राहुल रेखावार

धुळे, दि. 26 (जिमाका वृत्तसेवा) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 करीता 2- धुळे लोकसभा मतदारसंघात 29 एप्रिल 2019 रोजी मतदान होईल. त्यासाठी 2 एप्रिल 2019 रोजी अधिसूचना प्रसिध्द होईल. या पार्श्वभूमीवर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी व अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी मा. भारत निवडणूक आयोगांच्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करीत मतदान केंद्रांवर सुविधा पुरवाव्यात, असे … Continue reading भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशांप्रमाणे मतदान केंद्रांवर सुविधा पुरवाव्यात : जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी राहुल रेखावार

दिव्यांग मतदारांच्या मदतीसाठी मतदान केंद्रांवर स्वयंसेवकाची नियुक्ती : जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी राहुल रेखावार

धुळे, दि. 26 (जिमाका वृत्तसेवा) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 करीता प्रत्येक मतदान केंद्रावर दिव्यांग मतदारांच्या मदतीसाठी स्वयंसेवकाची नियुक्ती करण्यात येईल. अस्थिव्यंग मतदारांना मतदान केंद्रांपर्यंत आणण्यासाठी शासकीय वाहनाची व्यवस्था करण्यात येईल. त्याचे नियोजन करण्यात येत आहे. त्यासाठी दिव्यांग मतदारांनी 1950 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी राहुल … Continue reading दिव्यांग मतदारांच्या मदतीसाठी मतदान केंद्रांवर स्वयंसेवकाची नियुक्ती : जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी राहुल रेखावार

निश्चित केलेल्या दरानेच उमेदवारांनी खर्च सादर करावा : नोडल अधिकारी बाबूलाल पाटील

धुळे, दि. 23 (जिमाका वृत्तसेवा) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 करीता निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी व राजकीय पक्षांनी निश्चित केलेल्या दराने आणि वस्तू व सेवा कराचा समावेश असलेल्या देयकांसह अहवाल दररोज जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांना सादर करावयाचा आहे, असे बाबूलाल पाटील, नोडल ऑफिसर, एक्स्पेंडिचर मॉनिटरिंग कमिटी, 2- धुळे लोकसभा मतदारसंघ यांनी कळविले आहे. … Continue reading निश्चित केलेल्या दरानेच उमेदवारांनी खर्च सादर करावा : नोडल अधिकारी बाबूलाल पाटील

धुळे जिल्ह्यातील 84 हजार 888 नवमतदारांना ओळखपत्रांचे वितरण सुरू : जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी राहुल रेखावार

        धुळे, दि. 23 (जिमाका वृत्तसेवा) :   धुळे जिल्ह्यातील चारही तालुक्यातील 84 हजार 888 नवमतदारांचे ओळखपत्र प्राप्त झाले असून त्यांचे वितरण केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत (बीएलओ) सुरू आहे, अशी माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये दिली आहे.             जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांनी म्हटले आहे, नवमतदारांचे ओळखपत्र संबंधित बीएलओंकडे सुपूर्द करण्यात आले … Continue reading धुळे जिल्ह्यातील 84 हजार 888 नवमतदारांना ओळखपत्रांचे वितरण सुरू : जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी राहुल रेखावार