संकटकालीन परिस्थितीत ‘रेडक्रॉस’चे कार्य महत्वपूर्ण : जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे

  धुळे, दि. 31 (जिमाका वृत्तसेवा) : इंडियन रेडक्रॉस सोसायटी ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील सेवाभावी संस्थेची भारतीय शाखा आहे. या संस्थेला फार मोठा इतिहास आहे. या संस्थेचे संकटकालीन परिस्थितीतील कार्य महत्वपूर्ण आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी येथे केले. इंडियन रेड क्रॉस सोसायटी, धुळे शाखेतर्फे आज सकाळी आपत्ती व्यवस्थापन व प्रथमोपचार कार्यशाळेचे आयोजन करण्यात … Continue reading संकटकालीन परिस्थितीत ‘रेडक्रॉस’चे कार्य महत्वपूर्ण : जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे

जिल्हा कोषागार कार्यालयाचे जिल्हाधिकाऱ्यांकडून निरीक्षण

    धुळे, दि. 31 (जिमाका वृत्तसेवा) : जिल्हा कोषागार अधिकारी कार्यालयास जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी भेट देवून विविध विभागांचे निरीक्षण केले. जिल्हा कोषागार अधिकारी गजानन पाटील यांनी जिल्हाधिकारी डॉ. पांढरपट्टे यांचे स्वागत केले. यावेळी अपर कोषागार अधिकारी चैतन्य परदेशी, उप कोषागार अधिकारी एस.के.चौधरी, योगेश सोनवणे, उदय पाठक, अशोक खैरनार, पंकज देवरे, दिनेश खैरनार आदी … Continue reading जिल्हा कोषागार कार्यालयाचे जिल्हाधिकाऱ्यांकडून निरीक्षण

धुळे जिल्ह्यात 10 एप्रिल पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू राहणार

  धुळे, दि. 28 (जिमाका वृत्तसेवा) : आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्ह्यात 10 एप्रिल 2018 रोजीच्या रात्री 12 वाजेपर्यंत मुंबई पोलिस कायदा कलम 37 (1)(3) चे प्रतिबंधात्मक आदेश जिल्हाधिकारी तथा  जिल्हादंडाधिकारी डॉ.दिलीप पांढरपट्टे यांनी लागू केले आहेत. या आदेशात म्हटले आहे, पोलिस अधीक्षक, धुळे यांनी जिल्ह्यात 29 मार्च 2018 ते 1 एप्रिल 2018 या … Continue reading धुळे जिल्ह्यात 10 एप्रिल पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू राहणार

यात्रोत्सव काळात धुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल

       धुळे, दि. 28 (जिमाका वृत्तसेवा) :  धुळे शहरात आई श्री एकविरा देवी यात्रा उत्सव शनिवार 31 मार्च 2018 पासून साजरा होणार आहे. त्याअनुषंगाने 31 मार्च 2018 रोजी सायंकाळी शहरात काढण्यात येणाऱ्या पालखी मिरवणूक तसेच दर्शनासह नवस व जाऊळ काढण्याकरीता महाराष्ट्रासह इतर राज्यातून भाविक मोठ्या संख्येने वाहनाने येत असतात.             आई एकविरा देवी यात्रा उत्सवात … Continue reading यात्रोत्सव काळात धुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल

राष्ट्रीय सेवा योजनांतर्गत विशेष श्रमसंस्कार शिबिर

       धुळे, दि. 28 (जिमाका वृत्तसेवा) :  शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, धुळे येथील मुलांच्या वसतिगृहात राष्ट्रीय सेवायोजनेतंर्गत विशेष श्रमसंस्कार शिबीर नुकतेच संपन्न झाले. या शिबिरात विविध विषयांवर मान्यवरांची व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती.             धुळे महानगरपालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांचे हस्ते या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी  वाहतूक नियमावलीवर मार्गदर्शन, व्यक्तीमत्व विकास समरसता, मुलांच्या सामाजिक … Continue reading राष्ट्रीय सेवा योजनांतर्गत विशेष श्रमसंस्कार शिबिर

उन्हाळी हंगामातील पिकांसाठी पाणी अर्ज सादर करण्याचे आवाहन

   धुळे, दि. 28 (जिमाका वृत्तसेवा) :  जिल्ह्यातील लघुपाटबंधारे विभागातंर्गत मध्यम व लघु प्रकल्प उपसा सिंचन योजनेतंर्गत ज्या ठिकाणी पुरेसा पाणीसाठी उपलब्ध आहे, अशा प्रकल्पावरील पाण्याचा फायदा घेणाऱ्या सर्व बागाईतदार शेतकऱ्यांनी मार्च ते जून 2018 या कालावधीतील हंगामी पिकांसाठी पाणी अर्ज 15 एप्रिल 2018 पर्यंत सादर करण्याचे आवाहन कार्यकारी अभियंता, लघु पाटबंधारे विभाग, धुळे यांनी … Continue reading उन्हाळी हंगामातील पिकांसाठी पाणी अर्ज सादर करण्याचे आवाहन

व्यवसाय परीक्षेसाठी अर्ज भरण्याचे आवाहन  

  धुळे, दि. 27 (जिमाका वृत्तसेवा) : शिकाऊ उमेदवारांच्या 107 व्या अखिल भारतीय व्यवसाय परीक्षेस 1 मे 2018 पासून प्रारंभ होत आहे. या परीक्षेसाठी अर्ज भरण्याची अंतिम मुदत 10 एप्रिल 2018 पर्यंत आहे, असे सहाय्यक प्रशिक्षण सल्लागार, मूलभूत प्रशिक्षण तथा अनुषांगिक सूचना केंद्र, द्वारा, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, धुळे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे. ज्या … Continue reading व्यवसाय परीक्षेसाठी अर्ज भरण्याचे आवाहन  

शासकीय तांत्रिक विद्यालयात आज रोजगार मेळावा  

  धुळे, दि. 27 (जिमाका वृत्तसेवा) : केंद्र शासन पुरस्कृत दीनदयाळ अंत्योदय योजना- राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियानांतर्गत सहाय्यक संचालक, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, धुळे व धुळे महानगरपालिका, धुळे यांच्यातर्फे बुधवार 28 मार्च 2018 रोजी सकाळी 10 वाजता शासकीय तांत्रिक विद्यालय, जेल रोड, धुळे येथे एकदिवसीय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. … Continue reading शासकीय तांत्रिक विद्यालयात आज रोजगार मेळावा  

‘यशार्थ’मुळे ‘फड’ सिंचन पध्दतीला व्यापक प्रसिध्दी : गणेश मिसाळ धुळ्यात जलसंस्कृती विशेषांकाचे लोकार्पण

  धुळे, दि. 26 (जिमाका वृत्तसेवा) : जिल्हा माहिती कार्यालय, धुळे यांचे डिजिटल ई-साप्ताहिक ‘यशार्थ’च्या माध्यमातून धुळे जिल्ह्यातील ऐतिहासिक अशा ‘फड’ सिंचन पध्दतीला व्यापक प्रसिध्दी मिळाली आहे. ही माहिती डिजिटल वाचकांपर्यंत पोहोचविण्यात ‘यशार्थ’ची भूमिका महत्वपूर्ण आहे, असे प्रतिपादन उपविभागीय अधिकारी गणेश मिसाळ यांनी येथे केले. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या धुळे जिल्हा माहिती कार्यालयाचे डिजिटल साप्ताहिक … Continue reading ‘यशार्थ’मुळे ‘फड’ सिंचन पध्दतीला व्यापक प्रसिध्दी : गणेश मिसाळ धुळ्यात जलसंस्कृती विशेषांकाचे लोकार्पण