कन्टेन्मेन्ट झोनची आता कठोरपणे अंमलबजावणी करावी!

: जिल्हाधिकारी संजय यादव जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना विषाणूबाबत आढावा बैठक संपन्न धुळे, दि. 31 (जिमाका वृत्तसेवा) : धुळे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना विषाणूचे रुग्ण वाढत आहेत. ही चिंतेची बाब आहे. या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता कन्टेन्मेन्ट झोनची कठोरपणे अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. तसेच नागरिक विना मास्क किंवा कन्टेन्मेन्ट झोनमध्ये फिरताना दिसून येत आहेत. अशा … Continue reading कन्टेन्मेन्ट झोनची आता कठोरपणे अंमलबजावणी करावी!

खरीप हंगामातील पिकांसाठी

बागायतदारांनी पाणी अर्ज सादर करावेत धुळे, दि. 30 (जिमाका वृत्तसेवा) : खरीप हंगाम 2020 मध्ये भुसार, अन्नधान्ये, चारा, डाळी, कपाशी, भुईमूग व इतर हंगामी पिके इत्यासाठी पिकांना पाण्याच्या उपलब्धतेनुसार पाणी अर्ज सादर करण्याची मंजुरी देण्याचे ठरविण्यात आले आहे. त्यानुसार बागायतदारांनी आपले नमुना क्रमांक 7, 7 (अ), (ब) चे पाणी अर्ज संबंधित शाखा कार्यालयात किंवा उपविभागीय … Continue reading खरीप हंगामातील पिकांसाठी

प्रादेशिक परिवहन प्राधिकरणातर्फे

रुग्ण वाहिकांचे भाडेदर निश्चित धुळे, दि. 30 (जिमाका वृत्तसेवा) : प्रादेशिक परिवहन प्राधिकरण, धुळे यांच्या कार्यक्षेत्रात रुग्ण वाहिकांचे दर निश्चित करण्यात आले आहेत, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी, धुळे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे. प्रादेशिक परिवहन अधिकारी, धुळे यांनी म्हटले आहे, जनहित याचिकेमध्ये (क्र.CJ-ID-VD-13-2020) मुंबई उच्च न्यायालयाने नऊ जून 2020 रोजी दिलेल्या आदेशात रुग्ण वाहिकांचे दर … Continue reading प्रादेशिक परिवहन प्राधिकरणातर्फे

पीएम किसान योजनेतील लाभार्थ्यांनी

तांत्रिक त्रुटी दूर करून घ्याव्यात : जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे धुळे, दि. 30 (जिमाका वृत्तसेवा) : प्रधानमंत्री किसान सन्मान (PM-KISAN) निधी योजनेंतर्गत येणाऱ्या लाभार्थी शेतकऱ्यांनी 5 ऑगस्ट 2020 पर्यंत तांत्रिक त्रुटी दूर करून घ्याव्यात, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे यांनी केले आहे. त्यांनी म्हटले आहे, धुळे जिल्ह्यात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी … Continue reading पीएम किसान योजनेतील लाभार्थ्यांनी

धुळ्यातील टपाल कार्यालयात

राखी टपाल सेंटर कार्यान्वित धुळे, दि. 29 (जिमाका वृत्तसेवा) : महाराष्ट्र पोस्टल सर्कलमध्ये राखी टपाल वितरणासाठी खास व्यवस्था करण्यात आली आहे. राखी टपालाची प्राधान्य क्रमानुसार बुकिंग, प्रक्रिया आणि वितरणाची विशेष व्यवस्था राज्यातील सर्व टपाल कार्यालयात करण्यात आली आहे. त्यानुसार राखी टपाल सेंटर धुळे येथेही सुरू करण्यात आले आहे, असे प्रवर अधीक्षक, धुळे डाकघर, धुळे यांनी प्रसिध्दीस … Continue reading धुळ्यातील टपाल कार्यालयात

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत

शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवावा : जिल्हाधिकारी संजय यादव धुळे, दि. 29 (जिमाका वृत्तसेवा) : प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2020 असून धुळे जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी संजय यादव यांनी केले आहे. जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी म्हटले आहे, केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेत धुळे जिल्ह्यातील 39 हजार 345 … Continue reading प्रधानमंत्री पीक विमा योजनेत

धुळे जिल्ह्यात पीक कर्ज वितरणासाठी विशेष अभियान राबवा

    : कृषी मंत्री दादाजी भुसे विटाई येथे केली मका पिकाची पाहणी, लोणखेडी येथे महिला शेती शाळेस मार्गदर्शन धुळे, दि. 28 (जिमाका वृत्तसेवा) : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत धुळे जिल्ह्यातील 40 हजार 964 शेतकऱ्यांना 307 कोटी रुपयांच्या कर्जमुक्तीचा लाभ मिळाला आहे. त्या तुलनेत पीक कर्जाचे वितरण कमी आहे. त्यामुळे अग्रणी बँक, जिल्हा … Continue reading धुळे जिल्ह्यात पीक कर्ज वितरणासाठी विशेष अभियान राबवा

कृषी मंत्री दादाजी भुसे

आज धुळे जिल्हा दौऱ्यावर धुळे, दि. 27 (जिमाका वृत्तसेवा) : राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे मंगळवार 28 जुलै 2020 रोजी धुळे जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. मंत्री श्री. भुसे यांचा दौरा असा : मंगळवार 28 जुलै 2020 रोजी सकाळी 9 वाजता विटाई, ता. साक्री येथे आगमन, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत मका पीक प्रात्यक्षिक … Continue reading कृषी मंत्री दादाजी भुसे

धुळे जिल्ह्यातून आतापर्यंत 4 लाख 49 हजार क्विंटल कापसाची खरेदी

: जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे आतापर्यंत 14,143 शेतकऱ्यांकडील कापूस खरेदी, 30 सप्टेंबर 2020 पर्यंत करणार खरेदी धुळे, दि. 24 (जिमाका वृत्तसेवा) : धुळे जिल्ह्यातून आजअखेर 14 हजार 143 शेतकऱ्यांकडून चार लाख 49 हजार 606 क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे यांनी दिली आहे. धुळे जिल्ह्यात खरीप हंगामात … Continue reading धुळे जिल्ह्यातून आतापर्यंत 4 लाख 49 हजार क्विंटल कापसाची खरेदी

जिल्हाधिकारी कार्यालयात

लोकमान्य टिळक यांना अभिवादन         धुळे, दि. 23 (जिमाका वृत्तसेवा) :  लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आज सकाळी अभिवादनाचा कार्यक्रम झाला. जिल्हाधिकारी संजय यादव यांच्या हस्ते लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. यावेळी अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे,  उपजिल्हाधिकारी गोविंद दाणेज (रोहयो), सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी महेश चौधरी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित … Continue reading जिल्हाधिकारी कार्यालयात