पेट्रोल पंप चालकांनी अत्यावश्यक सेवेसाठी इंधनसाठा राखीव ठेवावा

धुळे : दिनांक 2 जानेवारी, 2024 (जिमाका वृत्त); पेट्रोलियम पदार्थांची वाहतुक करणारे वाहनचालक तसेच वाहतुकीदारांच्या संपामुळे पेट्रोल व डिझेल वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेता जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंप चालकांनी शासकीय कार्यालयातील वाहने, पोलीस दलाची वाहने, रुग्णवाहिका तसेच आपत्ती व्यवस्थापनांच्या वाहनाकरिता इंधनसाठा राखीव ठेवावा. इंधनाची कोणत्याही परिस्थितीत जादा दराने विक्री करु नये. नियमबाह्य व्यवहार आढळुन … Continue reading पेट्रोल पंप चालकांनी अत्यावश्यक सेवेसाठी इंधनसाठा राखीव ठेवावा

कौशल्य विकास व रोजगार व उद्योजकता विभागामार्फत 4 जानेवारी रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन

धुळे : दिनांक 2 जानेवारी, 2024 (जिमाका वृत्त); धुळे जिल्ह्यातील युवक-युवतींना विविध खासगी कंपन्या, कारखाने, उद्योग-व्यवसाय आणि आस्थापना यांचेकडील रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्याच्या उद्देशाने थेट नियुक्तीसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती कौशल्य विकास रोजगार व उद्योजकताचे सहायक आयुक्त राजू वाकुडे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, … Continue reading कौशल्य विकास व रोजगार व उद्योजकता विभागामार्फत 4 जानेवारी रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन

धुळ्यात 15 जानेवारी रोजी महिला लोकशाही दिनाचे आयोजन 5 जानेवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

*धुळे : दिनांक 1 जानेवारी, 2024 (जिमाका वृत्त);* जिल्ह्यातील समस्याग्रस्त व पिडीत महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे तसेच त्यांच्या हक्काचे संरक्षण होवून त्यांना न्याय मिळावा. यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हास्तरावर महिला लोकशाही दिन राबविण्यात येतो. त्यानुसार माहे जानेवारी महिन्याचा महिला लोकशाही दिन 15 जानेवारी,2024 रोजी सकाळी 11.00 वाजता जिल्हाधिकारी … Continue reading धुळ्यात 15 जानेवारी रोजी महिला लोकशाही दिनाचे आयोजन 5 जानेवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

महसुल वसुलीचे उद्दीष्ट वेळेत पूर्ण करावे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे महसुल अधिकाऱ्यांची बैठक संपन्न

*धुळे : दिनांक 29 डिसेंबर, 2023 (जिमाका वृत्त);* धुळे जिल्ह्यासाठी सन 2023-2024 या आर्थिक वर्षांत देण्यात आलेले महसुल वसुलीचे उद्दिष्ट विहित कालावधीत पूर्ण होईल यासाठी आवश्यक ते नियोजन आतापासूनच करावे. अशा सूचना नाशिक विभागाचे विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात विभागीय आयुक्त श्री. गमे यांच्या अध्यक्षतेखाली धुळे जिल्ह्यातील महसूल अधिकाऱ्यांची … Continue reading महसुल वसुलीचे उद्दीष्ट वेळेत पूर्ण करावे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे महसुल अधिकाऱ्यांची बैठक संपन्न

जिल्ह्यातील माजी सैनिकांच्या समस्यांचे निवारणासाठी सर्वेक्षण अर्जाचा विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते शुभारंभ

*धुळे, दिनांक 29 डिसेंबर, 2023 (जिमाका वृत्त);* अमृत जवान अभियानातंर्गत धुळे जिल्ह्यातील माजी सैनिक, माजी सैनिक विरमाता, विरपत्नी तसेच त्यांच्या वारसांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी सर्वेक्षण अर्जाचा नाशिक विभागाचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते आज शुभारंभ करण्यात आला. शासनाच्या अमृत जवान अभियानातंर्गत महुसल सप्ताहात ‘सैनिक हो तुमच्या साठी’ हा कार्यकम राबविला होता. या कार्यक्रमाचा उद्देश … Continue reading जिल्ह्यातील माजी सैनिकांच्या समस्यांचे निवारणासाठी सर्वेक्षण अर्जाचा विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते शुभारंभ

धुळ्याच्या इतिहासात आजचा दिवस सुवर्णाक्षरांनी नोंदविण्यासारखा; सुलवाडे –जामफळ प्रकल्प येत्या दोन वर्षांत पुर्ण करणार अक्कलपाडा प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत बैठकीचे आयोजन -पालकमंत्री गिरीष महाजन

धुळे, दिनांक 27 डिसेंबर, 2023 (जिमाका वृत्त); धुळे शहराच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंद व्हावी असा आजचा दिवस आहे. वर्षानुवर्ष सामान्य धुळेकर पिण्याच्या पाण्यासाठी आठ,दहा दिवस वाट बघत होतो. ज्या धुळे शहराचे पिण्याच्या पाण्याच्या दुरावस्थेमुळे वेगळी ओळख निर्माण झाली होती, तो ठपका मिटविण्याचा हा क्षण सुवर्णक्षरात नोंदविण्यासारखा असा दिवस आहे. आणि या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्याचे … Continue reading धुळ्याच्या इतिहासात आजचा दिवस सुवर्णाक्षरांनी नोंदविण्यासारखा; सुलवाडे –जामफळ प्रकल्प येत्या दोन वर्षांत पुर्ण करणार अक्कलपाडा प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत बैठकीचे आयोजन -पालकमंत्री गिरीष महाजन

नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेचे हॉल तिकीट ऑनलाइन उपलब्ध

धुळे : दिनांक 26 डिसेंबर, 2023 (जिमाका वृत्त); जवाहर नवोदय विद्यालय,नकाणे रोड, धुळे येथे शैक्षणिक वर्ष 2024-2025 मध्ये इयत्ता सहावी वर्गाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या प्रवेश परीक्षेचे हॉल तिकीट ऑनलाइन उपलब्ध असल्याची माहिती धुळे जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे. जवाहर नवोदय विद्यालयात शैक्षणिक वर्ष 2024-2025 मध्ये इयत्ता सहावी वर्गाच्या प्रवेशासाठी शनिवार, … Continue reading नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेचे हॉल तिकीट ऑनलाइन उपलब्ध

कौशल्य विकास व रोजगार व उद्योजकता विभागामार्फत 28 डिसेंबर रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन

धुळे, दिनांक 26 डिसेंबर, 2023 (जिमाका वृत्त); धुळे जिल्ह्यातील युवक-युवतींना विविध खासगी कंपन्या, कारखाने, उद्योग-व्यवसाय आणि आस्थापना यांचेकडील रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्याच्या उद्देशाने थेट नियुक्तीसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती कौशल्य विकास रोजगार व उद्योजकताचे सहायक आयुक्त राजू वाकुडे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, धुळे … Continue reading कौशल्य विकास व रोजगार व उद्योजकता विभागामार्फत 28 डिसेंबर रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन

अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

धुळे दि. 25 (जिमाका वृत्तसेवा) : देशाचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी राकेश प्रसाद, किरण बरडे, दिपक माळी, पी.एस.माटकर यांचेसह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. 00000

आर्वी परिसरात 26 ते 30 डिसेंबर रोजी गोळीबार सराव

धुळे : दिनांक 23 डिसेंबर, 2023 (जिमाका वृत्त); पोलिस प्रशिक्षण केंद्र, धुळे येथे नवप्रविष्ट पोलिस प्रशिक्षणार्थी यांचे प्रशिक्षण सत्र दहा सुरू झाले असून प्रशिक्षण सत्रातील प्रशिक्षणार्थींचा गोळीबार सराव 26 ते 30 डिसेंबर, 2023 या कालावधीत आर्वी येथील रोकडोबा फायरबट येथे होणार आहे. या कालावधीत सूर्योदय ते सूर्यास्तदरम्यान आर्वी, रोकडोबा परिसरातील ग्रामस्थ, नागरिकांनी गोळीबार सुरू असताना … Continue reading आर्वी परिसरात 26 ते 30 डिसेंबर रोजी गोळीबार सराव